राखी पौर्णिमा जवळ आली, की छातीत धडकी भरायचे दिवस आता सरले आहेत. तरीही राखीपौर्णिमेच्या निमित्तानं जुन्या जखमांवरच्या खपल्या निघतात आणि आमचा अश्वत्थामा पुन्हा गत आठवणींच्या भोवऱ्यात भिरभिरत राहतो...
शाळेच्या आवाराच्या तटबंदीपेक्षा जास्त भक्कम तटबंदी त्या वेळी आमच्या मनांची होती. मुलीकडे पाहणं म्हणजे "शांतम् पापम्' म्हणायचे ते दिवस. त्यातून आम्ही रत्नागिरीसारख्या छोट्या शहरातल्या सर्वांत "सुसंस्कृत' शाळेत, सर्वांत हुशार समजल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्गातले सहाध्यायी. सर्व जगाच्या संस्कृतीरक्षणाची जबाबदारी आमच्यावरच! "मैत्रीण' असणं वगैरे गोष्टी वर्ज्यच होत्या, साधं वर्गातल्या मुलीशी बोलणंही दुरापास्त होतं. शाळेच्या व्हरांड्यात मुलं-मुली घोळक्यानं गप्पा मारताहेत, एकत्र नाटकं-सिनेमे बघताहेत, टाळ्या देऊन खिदळताहेत, अशी दृश्यं पाहिली, की आपण शाळेत भोगलेल्या "नरकयातना' नको नको म्हणताना आठवतात.
आम्ही सातवीच्या वर्गात होतो. आमचा वर्ग जाम दंगा करायचा, त्यामुळे शिक्षा म्हणून आम्हाला एका बेंचवर एक मुलगा-एक मुलगी असं बसवण्यात आलं होतं. केवढा घोर अपमान, अन्याय वाटला होता आम्हाला तेव्हा! तेव्हा आम्ही एकमेकांशी घेतलेली खुन्नस, बेंचवर आखून घेतलेली हद्द वगैरे गोष्टी ब्लॉगवर लिहिल्या आहेतच.
वर्गात मुला-मुलींच्या जोड्या लावायची फॅशन होती. कुणी मुलगा एखाद्या मुलीच्या जागेवर बसला, की त्याला तिच्या नावानं चिडवलं जायचं. किंवा साधारणपणे मुलग्यांमधला हुशार क्रमांक एक आणि मुलींमधली हुशार क्र. 1, अशा क्रमानेही जोड्या लागायच्या. एकमेकांच्या नावांमधली सामायिक अक्षरं शोधून त्यानुसार जोड्या लावल्या जायच्या. शेजारी पाजारी किंवा एकाच भागात राहणाऱ्या मुलामुलींच्या जोड्या लावायला तर सोप्पंच होतं. एकाच भागात राहत असलो, तरी शाळेत एकत्र वगैरे जाण्याची सोयच नव्हती. साधं एखाद्या मुलीच्या मागून गेलो, तरी हा मुलगा आपल्या मागे लागलाय की काय, असा संशय या मुलींना यायचा. "दहशतवाद' त्या काळीही फोफावलेला होताच!
अशा चिडवाचिडवीला वैतागून मग त्यातून सहीसलामत बाहेर पडण्याचा सोपा मार्ग म्हणजे राखीपौर्णिमेचा "पवित्र' सण होता. आपल्याला ज्या नावाने चिडवलं जातं, त्या मुलाला राखी बांधली, की भानगडच मिटून जायची. मग कोण कशाला धाडस करतंय चिडवायचं? असे आगंतुक "भाऊराया' बनायला काही लोक अगदी उतावीळ असायचे, तर काहींच्या हृदयाची अगदी शंभर शकलं व्हायची.
वर्गातून गायब होऊन किंवा आवडत्या मुलीला टाळून या दहशतवादातून सुटण्याचा मार्ग होता. पण शाळेत होणाऱ्या सामूहिक रक्षाबंधनाचं काय? संघाच्या माध्यमातून शाळेत येणाऱ्या गोंड्याच्या राख्या प्रत्येकाच्या हातावर दिसल्याच पाहिजेत, असा शाळेचा दंडक होता. जणू सगळ्या मुलींचा संभाव्य तेजोभंग टाळण्याचा घाऊक मक्ताच शाळेने घेऊन टाकला होता! जेवढी मुलं, तेवढ्या राख्या वर्गात मागवल्या जायच्या आणि मग प्रत्येकाला समोर बोलावून एकेका मुलीनं त्याच्या प्रेमभावनांच्या सामूहिक कत्तलीचा साग्रसंगीत सोहळा पार पडायचा! तरीही शक्यतो आपली आवडती मुलगी आपल्याला राखी बांधायला येऊ नये, म्हणून मुलं जागांची अदलाबदल, बेंचखाली दडून राहणं, वगैरे वगैरे उपद्व्याप करायचे. कश्शाकश्शाचा म्हणून निभाव लागायचा नाही.
अर्थात, राखी बांधून घेण्यातही एक गंमत होतीच म्हणा! आपल्याला मुलगी राखी बांधतेय, म्हणजे इतरांपेक्षा जास्त भाव देतेय, असाही एक सर्वमान्य समज होता. हातावर राख्यांची संख्या जेवढी जास्त, तेवढा तो मुलगा मुलींचा लाडका, असंही एक गृहीतक होतं. त्यातून मुलीच्या नाजूक हातातून राखी बांधून घेताना होणारा अलगद स्पर्शही त्या वयात मनाला मोहरून टाकायचा, ही गोष्ट अलाहिदा! शिंगं फुटली, तशी राख्यांची जागा "फ्रेंडशिप बॅंड'नी घेतली. रस्तोरस्ती, गल्लोगल्ली त्यांचेही पेव फुटायच्या आतच आम्ही कॉलेजातून बाहेर पडलो होतो!
मनगटांतील राख्यांची आणि अपवादात्मक परिस्थितीत फ्रेंडशिप बॅंडची सद्दी संपली आणि लग्नाच्या वेळी हातात बांधलेला हळकुंडाचा दोरा हातात बांधला. दुसऱ्या दिवशी तो उतरवला असला, तरी आयुष्यभराची बेडी हातात पडली ती पडलीच!
जगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच!) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ!
Aug 23, 2010
Aug 12, 2010
ये रे माझ्या "माग'ल्या!
युवतीहृदयसम्राट, गालखळीचा बादशहा जॉन अब्राहम तसा नेहमीच चर्चेत असतो, पण या वेळची "पार्श्वभूमी' जरा वेगळी होती.
बातमी अशी होती, की जॉननं दहा कोटी रुपयांचा विमा करण्याचा घाट घातलाय...विमा कशाचा माहितेय? त्याच्या पार्श्वभागाचा! हो हो...!

`दोस्ताना'मध्ये त्यानं ज्याची झलक दाखवल्यानंतर त्याला त्याची जास्तच काळजी वाटू लागली असावी...
कुणी कुणाच्या कुठल्या अवयवाचा विमा करावा, याविषयी आपला आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही, पण ज्या विशिष्ट अवयवाचा त्यानं विमा करायचं ठरवलं, त्यावरून भुवया उंचावल्या जाणं साहजिक होतं. शिवाय, त्यासाठी दहा कोटी रुपये कुठली कंपनी मोजायला तयार होणार, ते विमा म्हणून नक्की कशाची हमी देणार, याविषयीचं कुतूहल जास्त होतं.
बातमीतून तरी ते काही स्पष्ट झालं नाही. माझ्या मनात मात्र अनेक कल्पना, शंकाकुशंकांनी थैमान घातलं. त्यातल्याच या काही...
1. एखाद्या व्यक्तीनं त्याच्या पार्श्वभागाचा विमा करून घेतला आणि कंपनीनं त्याला त्याच ठिकाणी लाथ मारून हाकललं, तर विम्याची संपूर्ण रक्कम मिळते का?
2. बूडही न हलवता तासन् तास एकाच जागी बसून जास्तीत जास्त काम करावं, अशी कंपनीची अपेक्षा असेल तर त्यासाठीच्या विम्याचा हप्ता कंपनीनंच भरायला नको का?
3. पार्श्वभागाचं दर्शन घडविणाऱ्या जीन्स घातल्या, तर विम्याच्या हप्त्यात काही सवलत मिळते का?
4. "हिप्स डोन्ट लाय' असं कुणीतरी शकीरा नामक गुरूमाता म्हणून गेलेय, असं ऐकतो. "हिप्स'बाबतची "पॉलिसी' पण डोन्ट लाय, याची हमी कोण देणार?
5. ** फाटणे, ** मारणे, ** उदास होणे, अशा दुर्घटना/आपत्तींसाठी पण विमा योजना लागू होणार का?
---

Aug 11, 2010
मणिकांचन योग आणि माझ्या कर्माचे भोग!
गुरूपुष्य, अक्षय तृतीया वगैरे मुहूर्तावर सोने खरेदी करायची असते म्हणे.
- मी सर्वपित्री अमावस्येला करतो.
...
चतुर्थीच्या दिवशी गणपतीला, नवरात्रात चतुःशृंगीला जायचं असतं म्हणे.
- मी संध्याकाळी वेळ असेल तेव्हा पर्यटनासाठी म्हणून जातो.
...
संध्याकाळच्या वेळेत तेल, मीठ आणू नये, सोमवारी केस कापू नयेत, म्हणतात.
- मी हटकून त्याच दिवशीचा मुहूर्त धरतो.
...
बकवास रीतिरिवाज मी पाळत नाही. कुणी तसं सांगितलं तर मी मुद्दाम ते धुडकावण्याची खुमखुमी मला येते. पण अलिकडे का कुणास ठाऊक, (मुलीच्या लग्नाची चिंता सतावायला लागल्यामुळेही असेल कदाचित) सोने खरेदी करून ठेवण्याची खुमखुमी मला आली आहे. गेल्या महिन्यापासून तसा संकल्प केला आणि दोन महिने पारही पाडला. अलिकडच्या काळात सोन्याला सोन्याचा भाव आल्यापासून तर आपण त्यात गुंतवणूक करायलाच हवी, असं प्रकर्षानं वाटू लागलंय. त्यातून लॅपटॉपच्या "सरप्राइज गिफ्ट'साठी बायकोनं घरात जमवून ठेवलेलं सोनं उधळल्याचं रहस्योद्घाटन मला झाल्यानंतर तर हा किडा डोक्यात फारच वळवळायला लागला. गेल्या महिन्यापासून शिलकीतले पैसे सोन्यात घालायचा संकल्प केला आणि दोन महिने पारही पाडलाय. सोनं खरेदी करायचं ठरवणं, त्यासाठी वेळेत हातात पैसे असणं, हा "मणिकांचन योग'च! सुदैवानं तो जुळून आलाय.
नमनाला एवढं घडाभर तेल ओतण्याचं कारण असं, की याच सोन्यानं आज एका संभाव्य भुर्दंडातून मला वाचवलं.
सकाळी सकाळी बहिणीचा फोन आला. बॅंकेत लॉकरच्या किल्ल्यांवर एम्बॉसिंग करून मिळणार आहे आणि त्याची मुदत आज आणि आणखी एक दिवस, अशी दोनच दिवस आहे, असं तिनं सांगितलं. या मुदतीत करून न घेतल्यास ग्राहकांना स्वतःच्या पैशांनी ते करून घ्यावं लागणार आहे, असंही समजलं. तसं पत्र तिला बॅंकेकडून आल्याचं तिनं सांगितलं. मला असं काहीच पत्र आल्याचं आठवत नव्हतं. मी तिच्या सूचनेचं पालन करायचं ठरवलं आणि सकाळी सकाळी बॅंकेत जाऊन धडकलो. विचार केला, लॉकरची किल्ली घेऊन जात आहोत, तर लॉकर उघडून घरातलं काहीबाही ठेवूनही यावं. भविष्यकालीन योजनेसाठी घेतलेलं सोनंही त्यात होतंच.
घरातून लॉकरची किल्ली चटकन शोधून बॅंकेत पोचलो, तर हीऽऽऽऽ गर्दी होती. आधी लॉकर उघडून ते काम पूर्ण करावं, मग एम्बॉसिंगसाठी किल्ली द्यावी, असं ठरवलं. लॉकर उघडायला गेलो, तर किल्लीच लागेना. सोबत आलेल्या बाईंनी त्यांच्याकडची किल्ली लावली, तरी कुलूप ढिम्म. मग त्यांनी आलटून पालटून सगळ्या किल्ल्या लावून बघितल्या. दुसरा जुडगाही आणला. तरीही काहीही फरक नव्हता. मी चुकीची किल्ली आणली असेल, असं त्यांनी भीत भीत सुचवून पाहिलं, पण मी त्यांना धुडकावून लावलं. आमच्या घरात अशी दुसरी किल्लीच नाहीये, असं छातीठोकपणे सांगितलं. मग त्या थकल्यावर त्यांनी एका शिपायाला ते काम दिलं. त्याचेही प्रयत्न निष्फळ ठरले.
त्यांच्यावर उपकार केल्याच्या थाटात, "तरीही मी किल्ली चुकलेय का ते पाहतो,' असं मोठ्या मनानं मी त्यांना सांगितलं.
बाहेर पडल्या पडल्या हर्षदाला फोन केला आणि झाला प्रकार सांगितला.
""तू चुकीची किल्ली नेली असशील!'' तिनं पहिलेछूट सांगून टाकलं.
स्वतःबद्दलही नसेल, एवढा विश्वास बायकांना नवऱ्याच्या गबाळेपणाबद्दल कसा असतो, कुणास ठाऊक!
तरीही मी मनाचा हिय्या करून तिला प्रत्युत्तर देण्याचं धाडस केलं. तूच कुठली तरी किल्ली आणून ठेवली असशील, मी चुकणं शक्यच नाही वगैरे तिला सांगून पाहिलं.
घरी येऊन तपासलं, तर तिचंच म्हणणं बरोबर होतं.
चुकीची किल्ली नेली होती. आता मान खाली घालून पुन्हा बॅंकेत जाणं आलं. तरीही बॅंकेतल्या बाई माझ्याशी सौजन्यानं वागल्या.
"तुम्हाला एवढीही अक्कल नाही का हो,'च्या ऐवजी फक्त "बघा, मी तुम्हाला म्हणत होते ना,' एवढंच म्हणाल्या.
बाई देखण्या होत्या. त्यामुळे त्यांना "सॉरी' म्हणतानाही जिवावर आलं. त्यांनी त्याची दखलही घेतली नाही, हे सांगणे न लगे.
...
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, बॅंकेचं लॉकरसंदर्भातलं जे पत्र आलं नाही म्हणून मी त्या (देखण्या) बाईंशी भांडलोही होतो, ते आमच्या घरीच असल्याचं मला बायकोनं नंतर सांगितलं.
"मला आधी का सांगितलं नाहीस,' असा जाब विचारल्यावर, ते मीच फोडलं होतं, अशी मौलिक माहिती तिनं दिली.
"किल्लीच्या एम्बॉसिंगबद्दल मला का सांगितलं नाहीस,' असं विचारल्यावर "तू ते वाचलंही होतंस,' अशी आणखी मौलिक माहिती तिनं दिली.
"माझ्या दिव्य स्मरणशक्तीबद्दल कल्पना असूनदेखील, तूच ते लक्षात ठेवून मला का ठोठावलं नाहीस,' असा युक्तिवाद मी त्यानंतर केला.
कपाळावर हात मारून घेण्याखेरीज तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता!

Aug 9, 2010
काचांची `लांबी' आणि गृहकृत्यदक्षतेची `रुंदी'
"घरच्या छपराचे कोने (दोन बाजूंच्या कौलांना जोडणारी वेगळ्या प्रकारची कौले) बसवायला माणूस मिळत नव्हता. घरी यायला नाटकं करत होता. शेवटी मी त्याला झिडकारून छपरावर चढून कोने बसवले...''
रायकर मास्तर आम्हाला सांगत होते.
""कुणी अडून बसला, तर त्याच्यावर अजिबात अवलंबून राहायचे नाही, हे धोरण अंगी आणायला हवे. जगात कुणाचं काही अडणार नाही!''...त्यांची भूमिका ठाम होती.
आज मी घराच्या खिडक्यांना लांबी बसवली, तेव्हा त्यांची आठवण झाली.

"घरात इतर काही करत नाहीस. निदान तेवढं तरी काम कर!''
...अगदी अशाच नाही, पण अशा भावना असलेल्या भाषेत सहधर्मचारिणीनं आमचा उद्धार केला होता. त्यामुळं आपल्यालाही घराची काळजी आहे, घरासाठी आपलंही काही योगदान आहे, हे सिद्ध करणं आवश्यक होतं.
घराच्या खिडक्यांच्या काचांची लांबी पडली होती. पण आमच्या मासिक आर्थिक नियोजनाची "रुंदी' कमी झाल्यानं लांबी लावण्याचं काम बाहेरच्या कुणाला देणं शक्य होत नव्हतं. एका कामगाराला बोलावलं, त्यानं सगळ्या काचांचे एक हजार रुपये सांगितले होते. त्याच वेळी त्याच्या पुढ्यात त्या सगळ्या काचा फोडून त्यावर त्याला नाचायला लावावं, असं मला वाटलं होतं. पण घरच्या "हेमा'नं रोखलं.
बाहेरच्या कुणालाही काम द्यायचं नाही, असं ठरवलं खरं, पण याचाच अर्थ ते काम मी करण्याला पर्याय नाही, असा झाला होता. त्यासाठी बाहेरून लांबी आणणं आणि वेळात वेळ काढून ती लावणं गरजेचं होतं. बरेच दिवस ते काही जमत नव्हतं. एक काच तर अगदी पडायला आली, तेव्हा चिकटपट्ट्या लावून तिला व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. ती आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत होती.
अखेर आज मुहूर्त लागला. समोर बॅंकेत काही कामानिमित्त गेलो होतो, तेव्हा मनाचा हिय्या करून हार्डवेअरच्या दुकानात गेलो आणि अखेर लांबी खरेदी केली. घरी आणून लावूनही टाकली. ती तयार अवस्थेतलीच होती. त्यात काहीच मिक्स वगैरे करायचं नव्हतं. अवघ्या वीस रुपयांत दोन काचांचं काम उरकलं!
एवढे दिवस लांबी कुठे मिळेल, ती कशी वापरायची, हाच गहन प्रश्न होता. त्यामुळे टाळाटाळ चालवली होती. एखाद्या दुकानात जाऊन चौकशी करण्याची तसदीही घेतली नव्हती. आज अचानक मनात आलं आणि लांबी मिळूनही गेली!
काही गोष्टींना थेट भिडल्याखेरीज त्या हाताशी येत नाहीत, हेच खरं!!

ता. क. : या ब्लॉगपोस्टला फारशी "खोली' नाही, हे जरी खरं असलं, तरी "लांबी'च्या या मोहिमेबद्दल मला छाती "रुंद' करून सांगायचंच होतं! असो.
Aug 3, 2010
फ्रेंडशिप band (`बंद')!
""बाबा, आपल्याकडे फ्रेंडशिप बॅंड आहेत?''
शी-शू करायची अक्कल आत्ता आत्ता आलेली आमची साडेपाच वर्षांची चिमुरडी मला विचारत होती.
"नाहीत,' असं सांगून मी टाळण्याचा प्रयत्न केला.
""मला उद्या पाच -सहा फ्रेंडशिप बॅंड हवेत!'' तिनं फर्मान सोडलं.
""कशाला गं?'' मी साळसूदपणाचा आव आणला.
""आमच्या वर्गातली मुलं आज एकमेकांना बांधत होती. माझ्याकडे एकही नव्हता. मला उद्या हवा म्हणजे हवा!'' तिनं ठणकावलं.
आपला गरीब बिच्चाऱ्या पित्याच्या भूमिकेत शिरून गप्प बसलो. संध्याकाळी आईनं तिला फ्रेंडशिप बॅंड आणून दिले. आज वर्गातल्या तिच्या आवडत्या मुलांना ती बांधूनही आली.
आमची शाळा आठवली.
फ्रेंडशिप म्हणजे काय, ते आम्हाला सातवी-आठवीत कळू लागलं. तेदेखील मुला-मुलांच्या फ्रेंडशिपबद्दलच. मुला-मुलींची फ्रेंडशिप वगैरे नाव काढायचीच सोय नव्हती. एक गाल शिक्षकांनी आणि दुसरा घरच्यांनी लाल केला असता, अशी परिस्थिती होती.
शाळेत मुला-मुलींच्या गप्पा, मैत्रीवर अघोषित बंदी होती. शाळेनं तशी घातली नव्हती, पण प्रथाही नव्हती. मुला-मुलींना चिडवणं वगैरे चालायचं. एखाद्या मुलीला एखाद्या मुलाच्या नावानं जास्तच चिडवलं जाऊ लागलं, की ती राखीपौर्णिमेला थेट त्याला राखीच बांधायची. मुला-मुलींमध्ये एकच नातं होतं - भावा बहिणींचं! कसं अगदी पवित्र नातं!
आम्ही वर्ग डोक्यावर घ्यायचो म्हणून सातवीत आम्हाला भयंकर "शिक्षा' झाली होती. मुलींच्या शेजारी एकाच बाकावर बसण्याची!
एखाद्या मुलीच्या शेजारी बसण्यासारखा अपमान आणि अवहेलना नव्हती!
आम्ही मग बेंचवर "हद्द' आखून घ्यायचो. माझ्या हद्दीत तू फिरकायचं नाही...हात ठेवायचा नाही...पेन इकडे येता कामा नये, एवढ्या पातळीवर ही खुन्नस चालायची.
झ्या शेजारी राहणारी मुलगी माझ्या पुढच्याच बाकावर बसायची, पण मी वर्गात तिच्याशी जेमतेम एक-दोनदा बोललो असेन. तेदेखील पेन खाली पडलंय, खोडरबर आहे का वगैरे प्रश्नांसाठी.
फ्रेंडशिप वगैरे करण्याचं वारं कॉलेजात गेल्यावरच डोक्यात शिरलं. स्लॅमबुक देखील वर्षाच्या अखेरीस हाती पडलं.
फ्रेंडशिप करायची क्रेझ असते त्या वयात ती केली नाही, पण पुण्यात आल्यावर मात्र मनसोक्त अनुभवली. प्रत्यक्ष फ्रेंडशिपच्या जागी इथे व्हर्च्युअल, अर्थात नेट फ्रेंडशिप अनुभवायला मिळाली.
त्या माध्यमातून मात्र अनेक चांगले मित्र मिळाले. कुणी माझ्या गावाचे निघाले, कुणाशी विचार जुळले, कुणाशी भावनिक तारा जमल्या, कुणी "ग्राफिटी'चे चाहते निघाले. अनेकांशी दृढ मैत्री झाली. ती केवळ व्हर्च्युअल न राहता प्रत्यक्षही भेटणं झालं.
असं असलं, तरी फ्रेंडशिप बॅंड वगैरे मैत्रीच्या देखाव्यात कधी अडकावंसं वाटलं नाही. तशा दिखाऊ मैत्रीपेक्षा खूप घट्ट मैत्री असली, तरी ती जगाला ओरडून सांगावीशी वाटली नाही. कधीकधी स्पष्ट बोलण्यानं, अलिप्त वागण्यानं काही मित्र दुखावले, काही दूर गेले, काहींनी अचानक रामराम ठोकला. पण जे उरले, त्यांच्याशी छान संवाद राहिला. त्यांच्या आयुष्यात वेगवेगळी स्थित्यंतरं आली...दरवेळी मला साथीला जाता आलंच असं नाही, पण त्यांच्याबद्दल प्रेम, आपुलकी, मदतीची भावना कायम राहिली.
आजही आहे...जे दूर गेले, त्यांनाही या निमित्तानं परत येण्यासाठी ही हाक आणि जे आहेत, त्यांच्याशी मैत्री अधिक घट्ट व्हावी, ही सदिच्छा!
मनस्वीच्या फ्रेंडशिप बॅंडच्या निमित्तानं बऱ्याच आठवणींवरचा पडदा निघाला.
लिहायचं होतं जरा हलकंफुलकं, पण जरा भावनांचे कढ जास्तच झाले.
असो. माणसानं दर वेळी मन हलकं करण्यासाठी विनोदाचा आधार घेतलाच पाहिजे का?
----
तळटीप ः आजही फेसबुक, ऑर्कुटवर ओळखपाळख, स्वतःची माहिती देण्याचंही सौजन्य न दाखविता थेट "फ्रेंडशिप रिक्वेस्ट' पाठवणारे उपटसुंभ भेटतात. मी त्यांची माहितीही न बघता रिक्वेस्ट फेटाळून लावतो!

Subscribe to:
Posts (Atom)