Oct 24, 2007

पचका वडा

मित्रहो,

आपण अनेक पदार्थ खातो, पाहतो, अनुभवतो. त्यांची रेसिपीही माहिती करून घेतो. काही घरी बनवायला जमतात, काही जमत नाहीत. मग ते आपण आयते मिळवून खातो.पण इच्छा नसतानाही काही पदार्थांची चव चाखावी लागते. अशाच काही अनोख्या पदार्थांची माहिती देण्याचा हा अल्पसा प्रयत्न...


सध्या भाग पहिला ः पचका वडा

आपण मोठ्या उत्साहानं काही करायला जावं आणि तोंडघशी पडावं, असे अनुभव जागोजाग येत असतात. त्यातूनच हा रुचकर पदार्थ तयार होतो. हा पदार्थ आपण ज्या परिस्थितीत, किंबहुना, ज्या "स्थिती'त अनुभवू, त्यावर त्याची चव अवलंबून असते. उदा. समजा, एखाद्या तरुणानं तरुणीच्या हृदयापर्यंत आपल्या हृदयींचे गूज पोचवण्याचा घाट घातलाय आणि तिला कुठेतरी "बरिस्ता', "कॉफी डे' मध्ये बोलावलंय समजा. आणि ती बया त्याच्या भावना, प्रेम, एवढी वर्षं दिलेल्या गिफ्ट, गुलाब, तिची भरलेली बिलं, सगळं धाब्यावर बसवून "तुला तसल्या नजरेनं बघितलंच नाही रे राजा' असं सांगते किंवा "मी ऑलरेडी एंगेज आहे,' असा बॉंब त्याच्या तोंडावर फेकते, तेव्हा या घायाळ प्रेमवीराचा होतो, तो "पचका वडा.'

एखाद्याला "एप्रिल फूल' करायला जावं आणि त्यानं आपल्यालाच "मामा' बनवावं, असंही अनेकदा होतं. त्याला "आंबूस वडा'ही म्हणता येईल.पचक्‍याचा दणका जेवढा जास्त, तेवढी त्याची चव अस्सल. विशेषतः बरोबर कुणी असेल, तर त्याला केवळ दुसऱ्याचा वडा होत असताना चाखायला मिळणारी चव लाजवाब! तिला तोडच नाही.

टीप ः शक्‍यतो स्वतः एकदा करून घेतल्यानंतर दुसऱ्यालाही या पदार्थाची चव चाखायला द्यावी.


------------------------

4 comments:

Anamika Joshi said...

kai re nuktach vada khaun aalas ki kai ?
Barach aavadalela distoy mhaun recipe post keliyes agadi .. :)

स्नेहल said...

pachaka wada ani kilawar raja yancha kahi sambandh aahe kaa? :D

baki attaparyant tu kiti wade pachawale aahes mhane???

अमित said...

अभिजित `रत्नांग्रीकर'???
की अभिजीत ’रत्नागिरीकर’?
की अभिजीत ’पेंढारकर’? आता ह्या नावामागचे कोडे काय आहे?

बाकी पदार्थाची रेसीपी उत्तम लिहीली आहेस...
मी अजुन पर्यंत चाखला नसला [दैवाचा भाग...]तरी इतरांना ब-याचदा खायला लावला आहे. आता ही post वाचुन तर खावासा पण वाटतोय... :)

swapna said...

sahich!!!!!!!!!!
ase dusaryanche pachake wade hotana maja watate.apachan kadhihi hot nahi!!!!!!!!!!
pan swatacha kadhihi zala tari lagech apachan hot!!!!!!!!!!
ase me dusaryanche barech pachake aambat wade kelet!!!!!!!!!
ani swatahi khallet!!!!!!!pan kami wela!!!!!!!!!!
kay aahe apachanachi bhiti aahe na!!!!!!!!