मनस्वीची शाळा म्हणजे एक गंमतच आहे। खेळ, गाणी आणि दंगामस्ती! आजच शाळेतून सुटल्यावर सांगत होती, "आज आम्ही "कनिका'चं लग्न केलं आणि सानिकानं माझ्या हातावर खोटीखोटी मेंदी काढली.' आता या पोरी हे लग्न-लग्न कधी खेळतात आणि बाई तरी त्यांना परवानगी कशी देतात, कुणास ठाऊक!
असो। सांगायची गोष्ट ही, की गेल्या आठवड्यात नुसती धमाल होती. 14 तारखेला, रविवारी तिचा वाढदिवस होता. आम्ही खरं तर दरवर्षीसारखा साजरा करणार नव्हतो, तरी गेला बाजार तीसेक माणसं झालीच. यंदा पहिल्यांदाच ऑर्डर देऊन "मॉंजिनीज'चा (सुमारे 800 रुपयांचा) केक आणला होता. (माझ्या खाऊसाठी अख्ख्या आयुष्यात आई-वडिलांनी केलेल्या खर्चही याहून कमीच असेल!) मनस्वीच्या इच्छेप्रमाणे तो मिकी-माऊसचा होता. एक तर मॉंजिनीज-बिंजिनीज सारख्या ठिकाणी ऑर्डर देऊन केक वगैरे घेण्याची माझी पहिलीच वेळ होती. त्यामुळे केकचा फ्लेवर कोणता, सॉफ्ट की नॉर्मल वगैरे प्रश्नावली भ
रताना माझी फें-फें उडाली होती. केक आणायला स्कूटी घेऊन गेलो, तेव्हा कळलं, त्यावर बसण्याएवढा तो लहान नाहीये. काय करायचं, असा प्रश्न होता. मग वाटेत एका सत्शील दिसणाऱ्या रिक्षावाल्याला पकडलं. मनस्वी आणि तो केक दोघांना सांभाळून घरी पोचविण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकली. तोही बिचारा कबूल झाला. तिथून त्याच्यासह मॉंजिनीज आणि मग त्याच्या मागेमागे किंवा बरोबरीने घरी, अशी आमची वरात निघाली. मनस्वी आधी एकटी रिक्षात बसायला तयार नव्हती, पण केकचीही जबाबदारी असल्याने कदाचित आपण मोठं झाल्यासारखं वाटत असावं.
संध्याकाळी वाढदिवस छान झाला। घरी फार सजावट केली नव्हती. केक, पावभाजी, गुलाबजाम, असा बेत होता. सोसायटीतली चिल्ली-पिल्ली आणि काही नातेवाईक, अशी मंडळी होती. रत्नागिरीहून अप्पा खास त्यासाठी आले होते. आजारपणानंतर विश्रांती म्हणूनही त्यांना आईने इकडे पिटाळलं होतं. (विश्रांतीच्या नावाखाली ते रोज नव्या ठिकाणी फिरण्याची टूम काढत होते, ही गोष्ट निराळी! ते आईला अजून सांगितलं नाहीये!)
वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी, सोमवारी शाळेला सुटी होती। मंगळवारी, 16 तारखेला मनस्वीचं स्नेहसंमेलन होतं. अप्पांचा तोही योग चांगला होता. बाईंना नऊवारी साडी नेसवायची होती. ती अर्थातच कुणाकडून तरी उसनी, रेडिमेड आणली होती. पाच ते सहा अशा कार्यक्रमात मनस्वीचं नृत्य दहा मिनिटांचं होतं. त्यासाठी गेले महिनाभर तयारी सुरू होती. ती घरीदेखील त्याच वातावरणात होती. एक-दोनदा तर माझ्याकडून आणि हर्षदाकडूनही तिनं डान्सची प्रॅक्टिस करून घेतली होती! "उदे गं अंबे उदे' हा गोंधळ होता. नावाप्रमाणेच नृत्यातही गोंधळ झाला. मनस्वी नाचते चांगली, पण ती दुसऱ्या रांगेत होती. पुढच्या दोन मुली व्यवस्थित नाचणाऱ्या नव्हत्या. त्यामुळे मनस्वीचा उत्साह काहीसा झाकोळला गेल्याचं जाणवलं. तुलनेने, शाळेतल्या तिच्या पहिल्या कार्यक्रमाच्या वेळी तिचं नृत्य उत्तम झालं होतं. त्यात मुली कमी होत्या आणि मनस्वीला नाचायलाही चांगला वाव होता.
कार्यक्रमांच्या वेळी पालक मधेमधे करतात, म्हणून कुणी पालकांनी फोटो किंवा व्हिडिओसाठी मध्ये येऊ नये, अशी सूचना शाळेनं आधीच केली होती। बसल्या जागेवरून फोटो काढणं शक्य नव्हतं. मी वशिल्यानं पहिल्या रांगेत जाऊन बसलो आणि तिथून व्हिडिओ घेतला. पण फारसा चांगला आला नाही. आता शाळेची डीव्हीडी भरमसाट किंमतीत विकत घ्यावी लागेल!
मधल्या सोमवारच्या दिवशी मी, अप्पा आणि मनस्वी थेऊरला जाऊन आलो। पण अगदी पोपटच झाला. एकतर आधी स्वारगेट, मग तिथून बऱ्याच प्रतीक्षेनंतर मिळालेल्या बसमधून थेऊर फाटा आणि नंतर तिथून तिसऱ्या बसने थेऊर, असा कंटाळवाणा प्रवास झाला. देऊळही मला अजिबात आवडलं नाही. मला एकतर निसर्गाच्या सान्निध्यातली, शांत ठिकाणची देवळं आवडतात. तर तेही असो.
स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मनस्वीच्या शाळेतला अल्पोपाहार रद्द झाला. त्याचे पैसे वाचवून मुंबई हल्ल्यातील हुतात्म्यांना द्यायचे ठरलेय म्हणे! पोरांचा उगाच हिरमोड. पण मनस्वीला सुटी मिळाली. आता उद्या, बुधवारी फक्त दोन तास शाळा आहे. नंतर नाताळची आठ दिवस सुटी! कार्टी डोकं पिकवणार आहे आठवडाभर!!
http://picasaweb.google.com/abhi.pendharkar/ManasviSBirthday?feat=email#
असो। सांगायची गोष्ट ही, की गेल्या आठवड्यात नुसती धमाल होती. 14 तारखेला, रविवारी तिचा वाढदिवस होता. आम्ही खरं तर दरवर्षीसारखा साजरा करणार नव्हतो, तरी गेला बाजार तीसेक माणसं झालीच. यंदा पहिल्यांदाच ऑर्डर देऊन "मॉंजिनीज'चा (सुमारे 800 रुपयांचा) केक आणला होता. (माझ्या खाऊसाठी अख्ख्या आयुष्यात आई-वडिलांनी केलेल्या खर्चही याहून कमीच असेल!) मनस्वीच्या इच्छेप्रमाणे तो मिकी-माऊसचा होता. एक तर मॉंजिनीज-बिंजिनीज सारख्या ठिकाणी ऑर्डर देऊन केक वगैरे घेण्याची माझी पहिलीच वेळ होती. त्यामुळे केकचा फ्लेवर कोणता, सॉफ्ट की नॉर्मल वगैरे प्रश्नावली भ

संध्याकाळी वाढदिवस छान झाला। घरी फार सजावट केली नव्हती. केक, पावभाजी, गुलाबजाम, असा बेत होता. सोसायटीतली चिल्ली-पिल्ली आणि काही नातेवाईक, अशी मंडळी होती. रत्नागिरीहून अप्पा खास त्यासाठी आले होते. आजारपणानंतर विश्रांती म्हणूनही त्यांना आईने इकडे पिटाळलं होतं. (विश्रांतीच्या नावाखाली ते रोज नव्या ठिकाणी फिरण्याची टूम काढत होते, ही गोष्ट निराळी! ते आईला अजून सांगितलं नाहीये!)
वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी, सोमवारी शाळेला सुटी होती। मंगळवारी, 16 तारखेला मनस्वीचं स्नेहसंमेलन होतं. अप्पांचा तोही योग चांगला होता. बाईंना नऊवारी साडी नेसवायची होती. ती अर्थातच कुणाकडून तरी उसनी, रेडिमेड आणली होती. पाच ते सहा अशा कार्यक्रमात मनस्वीचं नृत्य दहा मिनिटांचं होतं. त्यासाठी गेले महिनाभर तयारी सुरू होती. ती घरीदेखील त्याच वातावरणात होती. एक-दोनदा तर माझ्याकडून आणि हर्षदाकडूनही तिनं डान्सची प्रॅक्टिस करून घेतली होती! "उदे गं अंबे उदे' हा गोंधळ होता. नावाप्रमाणेच नृत्यातही गोंधळ झाला. मनस्वी नाचते चांगली, पण ती दुसऱ्या रांगेत होती. पुढच्या दोन मुली व्यवस्थित नाचणाऱ्या नव्हत्या. त्यामुळे मनस्वीचा उत्साह काहीसा झाकोळला गेल्याचं जाणवलं. तुलनेने, शाळेतल्या तिच्या पहिल्या कार्यक्रमाच्या वेळी तिचं नृत्य उत्तम झालं होतं. त्यात मुली कमी होत्या आणि मनस्वीला नाचायलाही चांगला वाव होता.
कार्यक्रमांच्या वेळी पालक मधेमधे करतात, म्हणून कुणी पालकांनी फोटो किंवा व्हिडिओसाठी मध्ये येऊ नये, अशी सूचना शाळेनं आधीच केली होती। बसल्या जागेवरून फोटो काढणं शक्य नव्हतं. मी वशिल्यानं पहिल्या रांगेत जाऊन बसलो आणि तिथून व्हिडिओ घेतला. पण फारसा चांगला आला नाही. आता शाळेची डीव्हीडी भरमसाट किंमतीत विकत घ्यावी लागेल!
मधल्या सोमवारच्या दिवशी मी, अप्पा आणि मनस्वी थेऊरला जाऊन आलो। पण अगदी पोपटच झाला. एकतर आधी स्वारगेट, मग तिथून बऱ्याच प्रतीक्षेनंतर मिळालेल्या बसमधून थेऊर फाटा आणि नंतर तिथून तिसऱ्या बसने थेऊर, असा कंटाळवाणा प्रवास झाला. देऊळही मला अजिबात आवडलं नाही. मला एकतर निसर्गाच्या सान्निध्यातली, शांत ठिकाणची देवळं आवडतात. तर तेही असो.
स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मनस्वीच्या शाळेतला अल्पोपाहार रद्द झाला. त्याचे पैसे वाचवून मुंबई हल्ल्यातील हुतात्म्यांना द्यायचे ठरलेय म्हणे! पोरांचा उगाच हिरमोड. पण मनस्वीला सुटी मिळाली. आता उद्या, बुधवारी फक्त दोन तास शाळा आहे. नंतर नाताळची आठ दिवस सुटी! कार्टी डोकं पिकवणार आहे आठवडाभर!!
http://picasaweb.google.com/abhi.pendharkar/ManasviSBirthday?feat=email#
1 comment:
AV,無碼,a片免費看,自拍貼圖,伊莉,微風論壇,成人聊天室,成人電影,成人文學,成人貼圖區,成人網站,一葉情貼圖片區,色情漫畫,言情小說,情色論壇,臺灣情色網,色情影片,色情,成人影城,080視訊聊天室,a片,A漫,h漫,麗的色遊戲,同志色教館,AV女優,SEX,咆哮小老鼠,85cc免費影片,正妹牆,ut聊天室,豆豆聊天室,聊天室,情色小說,aio,成人,微風成人,做愛,成人貼圖,18成人,嘟嘟成人網,aio交友愛情館,情色文學,色情小說,色情網站,情色,A片下載,嘟嘟情人色網,成人影片,成人圖片,成人文章,成人小說,成人漫畫,視訊聊天室,性愛,a片,AV女優,聊天室,情色
Post a Comment