
"समस्त अंगप्रदर्शक नायिका संघटने'च्या धाडसी प्रवक्त्या, आमच्या प्रेरणास्थान आणि समस्त उदयोन्मुख नायिकांच्या स्फूर्तिस्थान असलेल्या, "थेट बोल'सम्राज्ञी मल्लिकाताई शेरावत यांना त्रिवार प्रणाम! ताई, केवळ आपण होतात म्हणूनच माझ्या रूपात आमूलाग्र बदल होऊ शकला. माझं जुनंपुराणं, "काकूबाई' रूप घालवून तुम्हीच मला नवं, आकर्षक आणि "वळणदार' रूप मिळवून दिलंत.
आपली आंतरराष्ट्रीय ख्यातीची ऐश्वर्याही आमच्या कुठल्या भगिनीचा असा "काया'पालट घडवू शकली नव्हती. आता तर मल्लिकाकडे बघावं, की तुझ्याकडे असा प्रश्न पडतो, अशी "चावट' कॉमेंटही मला ऐकू येते. (माझं "कर्व्ही' हे नवं रूप खास तरुणांसाठी आहे, असंही मल्लिकाताई म्हणाल्या...इश्श्य!)
परमपूज्य मा. मल्लिकाताईंच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा!!
-शुभेच्छुक, सेव्हन अप "कर्व्ही'
No comments:
Post a Comment