तसल्या नजरेनं तुला कधी पाहिलंच नाही रे (राजा!)
ज्या वाक्यांची अस्मादिकांना सर्वाधिक तिडीक आहे, (आणि तरीही "कोवळ्या' वयात जे किमान दहा-बारा वेळा तरी ऐकावं लागतं,) अशापैकी एक वाक्य.
परवा "असंभव'मधला एक लाडिक, मधाळ सीन पाहताना हे वाक्य डोळ्यासमोर नाचत होतं. नको-नको म्हणत असताना मन पुन्हा कॉलेजच्या दिवसांत गेलं.
डोंबलाची "तसली नजर'!
एकतर प्रेम आहे किंवा नाही!
तू मला आवडतोस, किंवा नाही!"
कधीपासून वाट पाहत होते तुझ्या या प्रश्नाची' किंवा "तोंड पाहिलंयस का आरशात?'
एखाद्या मुलीला "प्रपोज' केल्यानंतर उत्तरादाखल तिचा वरीलपैकीच काहितरी पर्याय असायला हवा, अशी आपली आमची साधी, सरळ अपेक्षा.
ही "तसल्या नजरे'ची काय भानगड?आम्ही तर आयुष्यभर (हो, हो, बायकोची नजर चुकवून अजूनही!) पाहण्यात, संपर्कात, माहितीत आलेल्या प्रत्येक मुलीला "तसल्या' नजरेनं पाहत आलो आहोत.
"तसल्या' म्हणजे वाईट नजरेनं नव्हे. तर हिच्याशी आपलं नातं काय? म्हणजे ही आपली संभाव्य बायको, जवळची मैत्रीण, खास मैत्रीण, नुसतीच मैत्रीण, नुसतीच परिचित, बहीण, किंवा यापैकी कुणीच नाही या वर्गवारीत पहिल्या एक-दोन भेटींतच (जमल्यास पहिल्याच भेटीत) तिची रवानगी करत आलो आहोत.
"आमची नुसतीच मैत्री आहे. एकमेकांचा तशा दृष्टीनं विचारच केला नाही अजून,' असला खोटारडेपणा आपल्याला आयुष्यात कधी जमला नाही, जमणार नाही.अरे हा काय तमाशा आहे?म्हणजे, एवढी वर्षं सांडासारखे उधळलात...गावभर बोंबलत फिरलात...मिळेल त्या मुलीशी/मुलाशी ओळख काढायला, लाईन मारायला रक्तच नव्हे, (बापाचे) पैसेही आटवलेत. तेव्हा कुठे गेली होती तुमची "तसली नजर'? अरे? एकदा-दोनदा-तीनदा-दहादा भेटलेल्या मुलाकडे/मुलीकडे तुम्ही मैत्रीच्या पलीकडे कुठल्याच दृष्टीने पाहिलेलं नाही? तिच्यात तुम्हाला संभाव्य बायको, सहचारिणी दिसलीच नाही? कसली तुमची नजर?
हिंदी पिक्चर पाहताना तर दरवेळी या संवादांनी आपलं डोकं उठत आलं आहे. ते दोघं एकमेकांशी उसासत, धपापत, (जमल्यास) अंग घुसळत बोलतात. एकमेकांना सूचक हावभाव, संवादांची देवाणघेवाण करतात. पण प्रत्यक्ष निर्णयाची वेळ आली, की मात्र एकमेकांबद्दल "प्रेम' असल्याच्या भावनेनं त्यांना धक्काच बसतो. त्यांची "तसली नजर' तडमडते मध्ये.
सब बकवास है. "तसली नजर' बिजर काही नाही. अंगाशी आलं की माणसं हात आखडता घेतात. पळवाटा आहेत सगळ्या. खरं बोलायची हिंमत नसते लोकांमध्ये.
-------