""छ्या! यंदाच्या "मिस अर्थ'मध्ये काहीच अर्थ नाही! कुठल्याही ब्यूटी कॉंटेस्टमध्ये पहिल्या आलेल्या मुली कशा एसटीत बसून पोटात ढवळल्यावर उलटी दाबल्यासारखे हात तोंडावर ठेवतात....तसे हिनं का नाही ठेवले?'' चि. कुरकुरे सक्काळी सक्काळी टीव्ही बघताना चेष्टेच्या मूडमध्ये होता.
""ईईईई...काय काहितरी घाणेरडं बोलतोस रे?'' कु. किरकिरेनं त्याच्या डोक्यात एक टप्पल मारली.
""घाणेरडं काय? दर वेळी तसेच नाही का फोटो येत? पण ही निकोल का कोण, तिनं चक्क संपूर्ण चेहरा दाखवणारे फोटो दिलेत, म्हणून जरा शंका आली, एवढंच!''
""बरं. कळली हा तुमची अक्कल! आता गप्प बसा.'' कु. त्याला पुन्हा दटावली.
""आणि ज्या प्रश्नाच्या उत्तरावर ती जिंकली, तो वाचलात का तुम्ही बाबा?''
""नाही चिरंजीव! आपणच सांगा!'' आता बाबांनीही परिसंवादात उडी घेतली होती.
""तिला विचारलं, दिवसातली सगळ्यात आवडती वेळ कोणती, तर म्हणते सूर्योदयाची!''
""बरोबर आहे, सकाळी सकाळी पोट साफ झालं, की दिवस कसा छान जातो!'' श्री. कुरकुरेंनी आरोग्य, आहार, संतुलनाची टेप लावली.
""शी बाबा! तुम्ही पण काय बोलता?'' कु. पुन्हा कुरकुरली, तशा चि. कुरकुरेंना उकळ्या फुटल्या.
""आज आईसाहेबांच्या काही एक्स्पर्ट कमेंट्स नाहीत का?'' चि. नं आता आईला वादात ओढलं.
""अरे ती निकोल का कोण ती...तिला म्हणं आमच्या घरातला पसारा एकदा आवरून बघ. सगळं सौंदर्य काळवंडेल तिचं!'' चिरंजीवांचं निमंत्रण स्वीकारून सौ. कुरकुरेही आता मैदानात उतरल्या.
""जाऊ दे, जाऊ दे. भांडण नको. ती तिकडे जिंकणार, मग गावभर फिरणार, मुलाखती देणार, समाजसेवेच्या गप्पा मारणार...आपल्याला कशाला चिंता?'' श्री. कुरकुरेंनी कधी नव्हे ते शांतीपथावरून मार्गक्रमण सुरू केले.
""बाबा, आणखी एक जोक वाचला का? ती बंगलोरमधल्या सायकल रिक्षा वाचवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी प्रयत्न करणारेय. प्रदूषण टाळण्यासाठी!''
""भले शाब्बास! या नटव्यांच्या डोक्यातलं समाजकार्याचं प्रदूषण कमी केलं पाहिजे आधी!'' सौ. कुरकुरे पुन्हा फिस्कारल्या आणि भाजी करपल्याचा वास आल्यानं पुन्हा स्वयंपाकघराकडे पळाल्या.