"बेवारस कुत्र्यांची नसबंदी करणार' ही बातमी वाचून माझं अवसानच गळालं.
घशाला कोरड पडली.
हातपाय लटलटू लागले
घशाला कोरड पडली.
हातपाय लटलटू लागले
जीभ फूटभर लोंबू लागली
मघाशीच एक विजेचा खांब "पावन' करून आलेलो असताना आता पुन्हा तिकडे जाण्याची उबळ आली.
फारच भयंकर बातमी होती. कुठल्या तरी सामाजिक संस्थेच्या किंवा पेठेतल्या कुठल्यातरी उपटसुंभाच्या मनात आल्यामुळे कोर्टात एक जनहित का काय ती याचिका दाखल झाली होती आणि कामधंदे नसलेल्या कोर्टानं आमच्याविरुद्ध हे फर्मान सोडलं होतं. मनातल्या मनात मेनका गांधींचा धावा सुरू केला. (मेनका की "मनेका'? सुधारून घ्या. व्याकरणाच्या नावानं आमची बोंब आहे!) या "मेनके'नं आमच्या भाईबंदांवर आणि समस्त प्राणिमात्रांवर अन्याय करणाऱ्या तमाम "विश्वामित्रां'ची तपश्चर्या भंग केली होती. सध्या मात्र आमची ही तारणहारिनी तिच्या पक्षाप्रमाणेच अज्ञातवासात गेल्यानं कितपत पावेल, याची शंकाच होती. तरीपण खडा टाकून बघायला काही हरकत नव्हती.

काही झालं, की ह्या हरामखोरांना आमचीच जात आठवते। सालं, नळीत घाला नाहीतर फळीत घाला, माणसाचं शेपूट वाकडं ते वाकडंच ! जित्याची खोड मेल्याशिवाय जायची नाही। काय तर म्हणे, भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झालाय। गेल्याच आठवड्यात भटक्या विमुक्तांनी मोर्चा काढल्याचं आठवत होतं। म्हणजे एकूणच "भटक्यां'वर संक्रांत आली होती तर! पण हे तर चक्क आमची "नसबंदी' करायला निघाले होते
काय काय स्वप्न रंगवली होती, वयात येताना॥! जोशांच्या कार्ट्यानं चोरून आणलेल्या ऍडल्ट फिल्म्स चोरून बघून तर चित्तवृत्ती खवळल्या होत्या। गुळगुळीत मासिकातली दोन-चार पान उचकटून त्यातली चित्रंही बघितली होती. परवा ती "मिनी' नजरेस पडल्यावर तर कलिजाच खलास झाला आपला! आता हिला पटवावं, कुत्र्या-मांजरांच्या साक्षीनं लग्न करावं, सुरेख कुठल्यातरी "हिल'वर हनीमूनला जावं...कसलं काय न् कसलं काय?आता ही "नसबंदी'ची टूम निघाली की कुणाला धरतील नि कुणाला नाही, कुणी सांगावं? नसबंदीचं इंजेक्शन बंदुकी-बिंदुकीतून मारलं तर? त्यांचा काय नेम नाही ब्वॉ
कुत्र्यांची संख्या काही भारताच्या भूमीला न पेलवण्याएवढी जास्त झालेली नाहीये। उलट, कुणाची झालेय, ती बघा! त्यांची नसबंदी करा आधी। बाकी, तुमच्या नसबंद्या पण अयशस्वी होतात, म्हणा।
असो। आता फक्त "थांबा आणि वाट पाहा' एवढंच हाती आहे. आमची दुखरी "नस' त्यांच्या हाती आहे
------