करण जोहर नावाचा एक मोठ्ठा दिग्दर्शक आहे. (कोण रे तो टवाळ, त्याचे सिनेमे पाहून असं वाटत नाही, असं म्हणतोय?)
मोठ्ठा म्हणजे यश, भपका, (अरे भंपका!), चमचमाट, झगमगाट, मोठमोठ्या ताऱ्यांचा लखलखाट (चित्रपटीय भाषेत याला "भव्यदिव्य' म्हणतात) या बाबतीत मोठ्ठा. लहान वयातही महान. शाहरुख खान, फराह खान, मनीष मल्होत्रा, गेला बाजार शंकर-एहसान-लॉय यांचा जिगरी दोस्त. कुठे शाहरुखला "केबीसी'साठी तयार कर, कुठे फराह खानला हनिमूनची तिकिटं काढून दे, मनीष मल्होत्राच्या नव्या दुकानाचं (बुटीक?) इंटिरिअर सुचव, अशी मित्रांसाठी पडेल ती ("पडेल' नव्हे!) कामं करणारा. अधूनमधून सिनेमेदेखील दिग्दर्शित करणारा. त्यातून छान छान मुली, गोड गोड दृश्यं, सुंदर सुंदर स्थळं दाखवणारा. भावनासम्राट! प्रेक्षकांचे डोळे आणि हृदयं पिळून गंगा, यमुना, सरस्वतीही दुथडी भरून वाहतील एवढा अश्रूंचा पूर काढणारा.
एवढं सगळं वर्णन अशासाठी, की हा भला गृहस्थही आमीर खानचा "तारे जमीं पर' पाहून हेलावला. त्याला आता "पालक' (याचा अर्थ पिता; भाजी नव्हे) व्हावंसं वाटायला लागलंय. ""मी आत्तापर्यंत लग्न केलेलं नाही. करायचा विचारही नाही; पण "तारे...' पाहिल्यानंतर पिता म्हणून आपल्या मुलाला समजून घेण्याची गरज मला वाटू लागलीय,'' असं त्यानं जाहीर केलं.पिता बनण्याची त्याची मनीषा लवकरच पूर्ण होवो. तो चित्रपटातला असल्यामुळे "व्हर्च्युअली' पिता वगैरे बनण्याची साधनाही करू शकतो.
आम्हाला काळजी वेगळीच आहे. करणने तर स्वततिकीट काढून, थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघितलाय. त्याच्या मनात काय भावना आहेत कोणास ठाऊक? पण आता, चित्रपटसृष्टीतील बऱ्याच बुजुर्ग कलाकारांसाठीही आमीर आता "तारे जमीं पर'चा विशेष खेळ आयोजित करणार आहे, म्हणे!
जगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच!) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ!
Showing posts with label कानपिचक्या. Show all posts
Showing posts with label कानपिचक्या. Show all posts
Jan 14, 2008
Jan 1, 2008
पीक "प्रेरणा' पेरणाऱ्यांचं...
बॉलिवूडकरांचं चित्रपट काढण्यामागचं "इन्स्पिरेशन' काय असेल, सांगता येत नाही. पूर्वी रामसेंचे "हॉररपट' पाहून प्रेक्षकांना हुडहुडी भरायची. अर्थातच त्यातल्या प्रसंगांच्या परिणामामुळं नव्हे, तर याला हे आणखी किती दिवस असे सिनेमा काढणार, या विचारांनी! जगातल्या समस्त कवट्या, प्रेतं, जंगलं, स्मशानं, हेच रामसेंचं "इन्स्पिरेशन' होतं. कवटीचं तर त्यांना एवढं प्रेम होतं, की चोर-दरोडेखोरांसारखं समस्त रामसे बंधूंच्या कपाळावर कवटीचं चित्र कोरलेलं असेल की काय, असंच वाटायचं.
देशप्रेम हे मनोजकुमारचं "इन्स्पिरेशन' होतं. पण नंतर त्याचा डोस एवढा झाला, की साक्षात भारतमातेलाही कसंसंच व्हायला लागलं असणार. प्रेमाचे पैलू हे काही प्रमाणात राज कपूर आणि यश चोप्रांचं "इन्स्पिरेशन' होतं. प्रेमाच्या या अंगाला नायिकांच्या अंगप्रत्यंगांचा जोड राज कपूरनं दिलं. यश चोप्रांनी तर सगळ्या प्रेमकथांना श्रीमंतीतच लोळवून घोळवून सादर केलं.राखी सावंतला नाही का, "नच बलिये'मधल्या पराभवानंतर अंतरात्म्याच्या आवाजाचं "इन्स्पिरेशन' मिळालं. म्हणूनच आपल्या फसवणुकीविरुद्ध गावभर बोंबलत सुटली ना ती!
आमीर खानला "लगान'च्या वेळी चांगल्या कथेमुळे निर्मितीचं आणि "तारे जमीं पर'च्या वेळी अमोल गुप्तेशी भांडणामुळे दिग्दर्शनाचं "इन्स्पिरेशन' मिळालं.तर असे हे सगळे "इन्स्पिरेशनिस्ट'! आत्ता सगळ्यांची आठवण होण्याचं कारण हे, की नुकताच आलेल्या "रिटर्न ऑफ हनुमान'चं "इन्स्पिरेशन' आधीचा "हनुमान' नाही, तर दिग्दर्शक अनुराग कश्यप हे आहे. आपले कुठलेच चित्रपट सात वर्षांच्या आपल्या मुलीला आवडले नाहीत, म्हणून अनुरागनं तिला "इम्प्रेस' करण्यासाठी हा चित्रपट केलाय, म्हणे!
आमची भीती दुसरीच आहे.गौरी खाननं "टाईम'साठी दिलेल्या बोल्ड फोटोवरून सगळ्याच ताऱ्यांच्या बायकांनी, हिमेश रेशमियावरून समस्त उदयोन्मुख गायकांनी, रामगोपाल वर्माच्या "आगी'वरून "शोले'च्या समस्त चाहत्यांनी काही "इन्स्पिरेशन' घेतलं, तर त्यांना आणि आपल्यालाही महागात पडेल!
---

Dec 24, 2007
स्त्री जन्मा, तुझी कहाणी !

एखाद्याच्या आयुष्याची लक्तरं तरी किती व्हावीत!
जीवनाच्या वाटेवरच्या प्रत्येक खाचखळग्यात ह्यांचंच तंगड का मोडावं?
दुर्दैवाचे दशावतार कसले, सहस्रावतारच ते!
अशीच एक अभागी पोरगी. सिनेमांत कामं करून, रिमिक्स गाण्यांत नाचून, "स्टेज शो' करून (कमीत कमी कपडे वापरून) पोटाची खळगी भरणारी. महाराष्ट्राची "शान', देशाची "जान'. पण कुणी तिच्या आडनावावरून कोटी करून तिला महाराष्ट्राची "खंत' म्हणालं. कुणी अश्लील, बीभत्स, उथळ, फटाकडी, अशी लेबलं लावली. एका मित्रानं भर पार्टीत तिचा गैरफायदा घेतला. तरीही, अवहेलना आणि बोलणी खावी लागली तिलाच बिच्चारीला! दोन-तीन महिने काही प्रसिद्ध व्यक्तींना एकाच घरात कोंडून घालून त्यांचे दैनंदिन उद्योग जगजाहीर करण्याच्या कुठल्याशा कार्यक्रमातही ती गाजली. पण तिथेही पदरी आली निराशा!
मग आणखी एक मोठी संधी मिळाली, स्टेजवर "ता ता थैया' करून लोकांच्या मनाबरोबरच "एसएमएस'ही जिंकण्याची. दिलखेचक नृत्यानं तमाम देशवासीयांची हृदयं जिंकून टीकाकारांच्या छाताडावर नाचण्याची. साथीला तिच्याशी जन्मोजन्मीच्या साथीचा वादा करणारा तिचा "आशिक'ही. जोडी फायनलपर्यंत पोचली. कुठल्याकुठल्या देवळांत ओट्या भरून झाल्या. देव प्रसन्न झाला, पण दैव रुसलंच. फायनलच्या निकालाच्या वेळी तिची "फसवणूक' झाली. नंतर तिला असं कळलं, की महिनाभर आधीच आपल्याला या कुटिल कारस्थानाचा सुगावा लागला होता. "टीआरपी' वाढवण्यासाठीच आपल्याला घेतलं गेलं होतं. आपल्याला खोटंनाटं रडायला, खिदळायला, नाटकी बोलायला लावण्यात आलं होतं. आपण नाचलो नाही, आपल्याला नाचवलं गेलं होतं. कुठल्याही घटनेची "एक्स्क्ुझिव्ह स्टोरी' करणाऱ्या कुठल्याशा चॅनेलवर मग तिनं टाहो फोडला. कॅमेऱ्यातले रोल संपेपर्यंत डोळ्यांतील अश्रूंना वाट करून दिली. हवा तेवढा वेळ "बाईट्स' दिले.
आता ही मर्द मराठी मुलगी स्त्री हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांकडेही जाणार आहे, असं कळतं. आपल्यावरच्या अन्यायाविरुद्ध दाद मागणार आहे. या सगळ्या बातम्यांच्या "फुटेज'चा याच कार्यक्रमाच्या पुढच्या भागासाठी तिला उपयोग होईल, असं कुणीतरी सांगितलंय म्हणे तिला!
--------
Dec 16, 2007
भय इथले संपत नाही...--------
खबर पक्की आहे. तमाम न्यूज चॅनेल्सवर दाखवली असली, तरी!
कॅथरिनानं (कतरिना, कॅथरिना, कॅटरिना...आपापल्या सोयीनुसार!) सल्लूमियॉंला सोडल्याची. सलमानचा पंधरा वर्षांतला सलग चौथा विवाहपूर्व घटस्फोट. आधी सोमी अली, मग संगीता बिजलानी, मग साक्षात ऐश्वर्या राय. आता त्याचा कॅथरिनाचा "कैफ'ही उतरला. बिच्चारी! अक्षयकुमार नावाच्या सज्जन, सत्शील, सद्गुणी माणसाबरोबर चार-दोन पिक्चरमध्ये कामं काय केली, सल्लूमियॉंचं डोकं भडकलं. का भडकू नये? त्यानंच तिला पिक्चर मिळवून दिले होते. पार्ट्यांमध्ये मिरवलं होतं. लोकांच्या गाठीभेटी करून दिल्या होत्या. हिंदी लिहिता-वाचता-बोलता येत नसताना, बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींत बसवलं होतं. तरीही तिनं "हारे' राम हारे राम हारे क्रिश्ना हारे राम' करत त्या अक्षयच्या भजनी लागावं? का? फक्त एक लग्न आणि सल्लूसारखेच तीन-चार विवाहपूर्व घटस्फोट यांचा अनुभव म्हणून?
आपला भाव घसरत चाललाय आणि अक्षयचा दर्जा घसरला असला, तरी भाव वाढतोय, हे खरं आहे. पण एवढ्याच कारणास्तव तिनं आपल्याला सोडावं? सल्लू जाम भडकला. त्यानं नेहमीसारखेच तमाशे केले. ऐश्वर्याला सोडल्यानंतर (म्हणजे, तिनं लाथ घातल्यानंतर त्यालाही बरेच दिवस अशी मिळाली नव्हती!) कॅथरिनानं शेवटी कंटाळून त्याला टाटा केला. पुढे गेल्यावर मागचं विसरायची तिलाही सवय झालेय आता!सध्या सल्लू नैराश्याच्या गर्तेत आहे म्हणे. एकतर काळविटाच्या शिकारीप्रकरणी शिक्षेची टांगती तलवार आहेच डोक्यावर. वाढत्या वयाचं टेन्शन आहे. त्यातनं अशा "मृगनयनी' सोडून गेल्यावर करायचं काय? भांडायचं कुणाबरोबर आणि तमाशे कुणासमोर करायचे?
अशा नैराश्यगस्तीत ("ओढगस्ती'च्या तालावर) घरातच गस्त (येरझाऱ्या) घालत असताना सल्लूला एकदम जुना मित्र संजूबाबा आठवला.
त्यानं फोन लावला, तर संजूबाबा कुठल्यातरी विपश्यना शिबिरात होता.
"दीर्घ श्वास घ्या...मन एकाग्र करा. लांबवर नजर टाका. आपल्या मनाचं सामर्थ्य ओळखा. मनातले विचार एकदम काढून टाका. आधीची कोरी पाटी पुसून नव्यानं काही रंगवण्याचा प्रयत्न करा...'
संजूबाबा आपल्याला सांगतोय, की समोरच्या शिबिरार्थींना, ते सल्लूला कळलं नाही....
Dec 4, 2007
"नच ले'लं आणि (न) "पच'लेलं...
घर क्र. 1. स्थळ ः डेनव्हर, अमेरिका.
""अरे, श्रीराम, वाचलंस का हे बाबा, तुझ्या बायकोनं कायकाय वाद निर्माण करून ठेवलेत तिकडे भारतात ते!''
""काय गं आई! मी तिचे सिनेमे कधी बघितले नाहीत, तर त्याबद्दलचे वाद कसे माहीत असणार मला? पण ते मिटल्याचं ऐकलंय मी!''
""ह्या पोरीनं तरी आधीच तपासून घ्यायचं ना सगळं? निष्कारण तिकडे वाद आणि आपल्या
जिवाला घोर.''
""आई, उगाच काळजी करतेस तू. ती अख्ख्या भारताची "धडकन' आहे. तिला काय त्रास होणार आहे?''
""कुणी सांगावं बाबा? ती होती म्हणे तेव्हा. पण कशाला उगाच रिस्क घ्यायची?''
""चालतं गं आई. ती आहे ना खंबीर. उगाच काळजी करतेस तू झालं.''
""बरं बाबा. गप्प बसते तू म्हणतोयंस तर. पण तिला लवकर बोलावून घे हो. घराचं रिनोवेशन पण सुरू करायचंय ना आपल्याला? कोण बघणार आहे त्याच्याकडे?''
--------
घर क्र. 2. स्थळ ः मुंबई.
""बेटी, तुला जिची वारस म्हटलं जातं, ती कानामागून येऊन तिखट होऊ पाहतेय. चोप्रांनीच तिला घेऊन नवा पिक्चर काढलाय. तू बस मगरींच्या मागे फिरत, नि फ्रिजचे गोडवे गात.''
""हो गं आई, माहितेय मला. मी तर तिच्यापेक्षा जास्त हिट सिनेमा दिला होता गेल्या वर्षी. तोसुद्धा भरपूर पब्लिसिटी करून घेऊन.''
""हो, पण पुढे काय? वर्ष उलटून गेलं त्याला!''
""असू दे. बघू, पुढे काय होतंय ते!''
""तुला काय झालं होतं चोप्रांच्या कनपटीला बसून आणखी एखादा सिनेमा मिळवायला?'' """दिसेन...लवकरच दिसेन. तू नको काळजी करूस.''
""बरं बाई, राहिलं. ती सव्वाशेर होऊ नये, म्हणजे झालं!''
----------
घर क्र. 3. स्थळ ः दिल्ली
""लोलो, आटपलं की नाही तुझं? किती वेळ लावतेस मेक-अपला? आता काय तू फिल्म इंडस्ट्रीत आहेस?'' ""माहितेय मला मम्मी! मला इंडस्ट्रीतून बाहेर काढायला तूही जबाबदार आहेस ना? चांगलं ठरलेलं लग्न मोडलंस माझं! आज मादाम तुसॉंमध्ये माझा पुतळा दिसला असता, तिच्या जागी...! तुझ्यामुळे बिघडलं सगळं.''
""उगाच माझ्या नावानं बोटं मोडू नकोस. तूच स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलायंस.''
""जाऊ दे. पुन्हा तो विषय नको.''
""मीही तेच म्हणतेय. आता नव्यानं प्रयत्न कर. पुन्हा सिनेमात काम करायला हरकत नाही. चोप्रांनीच तुम्हाला दोघींना एकत्र चमकवलं होतं ना? त्यांच्याकडे पुन्हा प्रयत्न करून बघ. धाकट्या बहिणीची मदत घे, हवं तर!''
""बघते. चल, मला रेसकोर्सवर जायचंय. शॉपिंगही आहे.''
""हेच करत बस आयुष्यभर!'' (चरफडत निघून जाते.)
----------------
घर क्र. 4, 5, 6, 7.... स्थळ ः मुंबई, अमेरिका, अज्ञात...
ऊर्मिला, ममता, शिल्पा, आदी एकत्र येऊन चर्चा करताहेत. संयुक्त मागणीचं एक निवेदन तयार करताहेत. थोडक्यात मसुदा असा ः मा. चोप्राजी, आजवर अनेक नव्या नायिकांना आपण चित्रपटांतून संधी दिलीत. आता काही "सीनिअर' नायिकांनाही देताय. आम्हालाही चांगल्या बॅनरची, चांगल्या कथांची गरज असून, त्यासाठी आमचा विचार करावा, ही विनंती.
- आपल्या नम्र,
(खाली डझनभर "माजी' नायिकांच्या सह्या...)
----------
""अरे, श्रीराम, वाचलंस का हे बाबा, तुझ्या बायकोनं कायकाय वाद निर्माण करून ठेवलेत तिकडे भारतात ते!''
""काय गं आई! मी तिचे सिनेमे कधी बघितले नाहीत, तर त्याबद्दलचे वाद कसे माहीत असणार मला? पण ते मिटल्याचं ऐकलंय मी!''
""ह्या पोरीनं तरी आधीच तपासून घ्यायचं ना सगळं? निष्कारण तिकडे वाद आणि आपल्या
जिवाला घोर.''""आई, उगाच काळजी करतेस तू. ती अख्ख्या भारताची "धडकन' आहे. तिला काय त्रास होणार आहे?''
""कुणी सांगावं बाबा? ती होती म्हणे तेव्हा. पण कशाला उगाच रिस्क घ्यायची?''
""चालतं गं आई. ती आहे ना खंबीर. उगाच काळजी करतेस तू झालं.''
""बरं बाबा. गप्प बसते तू म्हणतोयंस तर. पण तिला लवकर बोलावून घे हो. घराचं रिनोवेशन पण सुरू करायचंय ना आपल्याला? कोण बघणार आहे त्याच्याकडे?''
--------
घर क्र. 2. स्थळ ः मुंबई.
""बेटी, तुला जिची वारस म्हटलं जातं, ती कानामागून येऊन तिखट होऊ पाहतेय. चोप्रांनीच तिला घेऊन नवा पिक्चर काढलाय. तू बस मगरींच्या मागे फिरत, नि फ्रिजचे गोडवे गात.''
""हो गं आई, माहितेय मला. मी तर तिच्यापेक्षा जास्त हिट सिनेमा दिला होता गेल्या वर्षी. तोसुद्धा भरपूर पब्लिसिटी करून घेऊन.''
""हो, पण पुढे काय? वर्ष उलटून गेलं त्याला!''
""असू दे. बघू, पुढे काय होतंय ते!''
""तुला काय झालं होतं चोप्रांच्या कनपटीला बसून आणखी एखादा सिनेमा मिळवायला?'' """दिसेन...लवकरच दिसेन. तू नको काळजी करूस.''
""बरं बाई, राहिलं. ती सव्वाशेर होऊ नये, म्हणजे झालं!''
----------
घर क्र. 3. स्थळ ः दिल्ली
""लोलो, आटपलं की नाही तुझं? किती वेळ लावतेस मेक-अपला? आता काय तू फिल्म इंडस्ट्रीत आहेस?'' ""माहितेय मला मम्मी! मला इंडस्ट्रीतून बाहेर काढायला तूही जबाबदार आहेस ना? चांगलं ठरलेलं लग्न मोडलंस माझं! आज मादाम तुसॉंमध्ये माझा पुतळा दिसला असता, तिच्या जागी...! तुझ्यामुळे बिघडलं सगळं.''
""उगाच माझ्या नावानं बोटं मोडू नकोस. तूच स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलायंस.''
""जाऊ दे. पुन्हा तो विषय नको.''
""मीही तेच म्हणतेय. आता नव्यानं प्रयत्न कर. पुन्हा सिनेमात काम करायला हरकत नाही. चोप्रांनीच तुम्हाला दोघींना एकत्र चमकवलं होतं ना? त्यांच्याकडे पुन्हा प्रयत्न करून बघ. धाकट्या बहिणीची मदत घे, हवं तर!''
""बघते. चल, मला रेसकोर्सवर जायचंय. शॉपिंगही आहे.''
""हेच करत बस आयुष्यभर!'' (चरफडत निघून जाते.)
----------------
घर क्र. 4, 5, 6, 7.... स्थळ ः मुंबई, अमेरिका, अज्ञात...
ऊर्मिला, ममता, शिल्पा, आदी एकत्र येऊन चर्चा करताहेत. संयुक्त मागणीचं एक निवेदन तयार करताहेत. थोडक्यात मसुदा असा ः मा. चोप्राजी, आजवर अनेक नव्या नायिकांना आपण चित्रपटांतून संधी दिलीत. आता काही "सीनिअर' नायिकांनाही देताय. आम्हालाही चांगल्या बॅनरची, चांगल्या कथांची गरज असून, त्यासाठी आमचा विचार करावा, ही विनंती.
- आपल्या नम्र,
(खाली डझनभर "माजी' नायिकांच्या सह्या...)
----------
Nov 18, 2007
गोष्ट कडक आजोबांची आणि प्रेमळ नातवंडांची!
गोष्ट कडक आजोबांची
ता. क. सिनेमासृष्टीत असे अनेक आजोबा आहेत. काही नाइलाजाने निष्क्रिय, काही प्रेक्षकांच्या नाइलाजाने सक्रिय! त्यांची चेष्टा करण्याचा प्रसंग घडल्यास पुन्हा अशा बातम्या पाहायला मिळतील. बाय द वे, आपल्या या "देशभक्तिपरायण आजोबां'नी त्यांच्याच "जय हिंद' चित्रपटातील नायिकेने स्वतःच्या अंगावरचे कपडे जाळण्याचं जे रसाळ दृश्य चित्रित केलं होतं, तेही देशभक्तीवरची निष्ठा म्हणूनच बरं का!
आणि प्रेमळ नातवंडांची!
तशी टार
गट पोरं नव्हेतच ती. थोडीशी उथळ म्हणा, हवं तर! पण सिनेमात प्रचंड मान, कीर्ती असलेली. बरं, हे दोघांचं घरचंच कार्य. म्हणजे तिच्या कल्पनेतून झालेलं आणि त्याच्या पैशातून आणि कामातून. अगदी गोडगोड, छानछान. कुणाला दुखवणं नाही, चिडवणं नाही. अजातशत्रूच जणू! (सगळेच "गोडबोले' अजातशत्रूच असतात म्हणे. असो.)
गट पोरं नव्हेतच ती. थोडीशी उथळ म्हणा, हवं तर! पण सिनेमात प्रचंड मान, कीर्ती असलेली. बरं, हे दोघांचं घरचंच कार्य. म्हणजे तिच्या कल्पनेतून झालेलं आणि त्याच्या पैशातून आणि कामातून. अगदी गोडगोड, छानछान. कुणाला दुखवणं नाही, चिडवणं नाही. अजातशत्रूच जणू! (सगळेच "गोडबोले' अजातशत्रूच असतात म्हणे. असो.) पण त्यांच्या हातून एक छोटीशी चूक घडली. एका "आजोबां'ची नक्कल केली त्यांनी. बरं, हे आजोबा साधेसुधे नव्हेत. या "नातवंडां'चं बारसं जेवलेले. आपल्या "देशभक्ति'पर चित्रपटांनी भल्याभल्यांना सळो की पळो करून सोडलेले...झालं! त्यावरूनच रामायण सुरू झालं...!
बरं, चॅनेलवाल्यांनाही दिवाळीतल्या दोन नव्या सिनेमांची गाणी, गाण्यांमागच्या कहाण्या, नटनट्यांना शूटिंगदरम्यान किती वेळा शिंका आल्या आणि किती वेळा ठसके लागले, इथपासून अगदी
स्पॉटबॉय, जेवणाची व्यवस्था करणाऱ्या मावशी, सगळ्यांच्या मुलाखती दाखवून झाल्या होत्या. आता नवा रतीब काय घालायचा, असा प्रश्नच होता. त्यातच हे "आजोबा' हाताशी लागले. मग त्यांना (तोंडावरचा हात काढायला लावून) वेगवेगळ्या "मूड्स'मध्ये दाखवून, त्यांचा जळजळीत संताप टीव्हीवर दाखवून झाला.बरं, या "कीर्तिवान' मुलांनाही आपल्या सिनेमाची टिमकी वाजवायला काहीतरी नवं निमित्त हवंच होतं. त्यांनीही लगोलग पत्रकार परिषदेत लोटांगण घालून टाकलं! आता, सिनेमात एके काळी बराच मान मिळवलेल्या (आणि सध्या कुणालाच माहीत नसलेल्या) आजोबांची माफी मागायला त्यांचं काय जात होतं? एका दगडात तीन-चार पक्षी! मोठ्यांचा आदर केल्याचा देखावा, सिनेमाची पुन्हा चर्चा आणि आपल्या निरागसपणावर शिक्कामोर्तबही! बरं, आजोबांच्या कार्याचे गोडवे गाऊन त्यांना पुन्हा खूश केलं, की झालं काम! झालं, पेल्यातलं वादळ एका दिवसात पुन्हा पेल्यात गडप!
स्पॉटबॉय, जेवणाची व्यवस्था करणाऱ्या मावशी, सगळ्यांच्या मुलाखती दाखवून झाल्या होत्या. आता नवा रतीब काय घालायचा, असा प्रश्नच होता. त्यातच हे "आजोबा' हाताशी लागले. मग त्यांना (तोंडावरचा हात काढायला लावून) वेगवेगळ्या "मूड्स'मध्ये दाखवून, त्यांचा जळजळीत संताप टीव्हीवर दाखवून झाला.बरं, या "कीर्तिवान' मुलांनाही आपल्या सिनेमाची टिमकी वाजवायला काहीतरी नवं निमित्त हवंच होतं. त्यांनीही लगोलग पत्रकार परिषदेत लोटांगण घालून टाकलं! आता, सिनेमात एके काळी बराच मान मिळवलेल्या (आणि सध्या कुणालाच माहीत नसलेल्या) आजोबांची माफी मागायला त्यांचं काय जात होतं? एका दगडात तीन-चार पक्षी! मोठ्यांचा आदर केल्याचा देखावा, सिनेमाची पुन्हा चर्चा आणि आपल्या निरागसपणावर शिक्कामोर्तबही! बरं, आजोबांच्या कार्याचे गोडवे गाऊन त्यांना पुन्हा खूश केलं, की झालं काम! झालं, पेल्यातलं वादळ एका दिवसात पुन्हा पेल्यात गडप!---
ता. क. सिनेमासृष्टीत असे अनेक आजोबा आहेत. काही नाइलाजाने निष्क्रिय, काही प्रेक्षकांच्या नाइलाजाने सक्रिय! त्यांची चेष्टा करण्याचा प्रसंग घडल्यास पुन्हा अशा बातम्या पाहायला मिळतील. बाय द वे, आपल्या या "देशभक्तिपरायण आजोबां'नी त्यांच्याच "जय हिंद' चित्रपटातील नायिकेने स्वतःच्या अंगावरचे कपडे जाळण्याचं जे रसाळ दृश्य चित्रित केलं होतं, तेही देशभक्तीवरची निष्ठा म्हणूनच बरं का!-----
Nov 12, 2007
कानपिचक्या
थोरल्या कपूर घराण्यातला बबड्या आणि (काही अपरिहार्य कारणास्तव) "बिग बी'चा वारस न ठरू शकलेल्या धाकल्या कपूरांची बबडी. दोघांचा पहिलाच पिच्चर. त्यातून आंतरराष्ट्रीय ख्यातीचा. (म्हणजे, बहुतेक वेळा आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या कथा, कथासूत्र, कथेचा "जर्म', संकल्पना यावरून प्रेरणा घेणारा...थोडक्यात "ढापणारा') बरं, बॉलिवूडकरांना आधीच गरीब बापड्या प्रेक्षकांना मोठमोठी स्वप्नं दाखवायची भारी हौस. त्यातून हा तर बाबा तर काय, स्वप्नांचा घाऊक "मॉल'वाला. भसाभस बघ स्वप्नं, विक प्रेक्षकांना...बघ स्वप्न, विक प्रेक्षकांना...असं करणारा. तर अशा या सगळ्या तारकादळाचा पिच्चर येणार ऐन दिवाळीत.
त्याच वेळेला आपलं "भुजाबळ' दाखवायची बॉलिवूडचा "न भूतो न भविष्यती' असा सुपर-डुपर-टिपरस्टारची खुमखुमी! बरं, त्याचा सिनेमाही त्याच्याच जिवलग मैत्रीण कम बहीण कम सल्लागार कम मार्गदर्शक कम "फॅमिली फ्रेंड'नं दिग्दर्शित केलेला. त्याच्याही सिनेमात त्याची लाडकी एक "छबडी.' या दोन "रेड्यां'ची (हे संबोधन चित्रपटासाठी; व्यक्तींसाठी नव्हे.) झुंजही ऐन दिवाळीत. (असते एकेकाला हिंसाचाराची हौस!) मग जाहिरातबाजीही तशीच हवी. लहान मुलं उड्या मारत "माझी आई मोठी की तुझी आई मोठी' खेळतात ना, तसं "माझा बाप मोठा की तुझा बाप', तशीच ही स्पर्धा. मग टीव्हीवरचे नाच्यांचे ("नाचांचे' कसे म्हणावे?) कार्यक्रम, कुठल्या कुठल्या पार्ट्या, फॅशन शो, गेला बाजार सार्वजनिक हळदीकुंकू...जिथे संधी मिळेल तिथं आपल्या पिक्चरची वाणं वाटायचा सपाटाच. मधुबाला, वहिदा रहमान, माधुरी दीक्षितसकट तमाम सौंदर्यवतींना बाराच्या भावात काढतील, अशाच या "बबडी' आणि "छबडी' असल्याचा दिंडोरा. सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधी पण मजबूत प्रीमिअर वगैरे.
"आमच्या बबड्या-बबडीचं "विविध गुणदर्शन' पाहायला यायचं हं,' ही आईबाबांची प्रेमाची सक्ती. त्यामुळं तमाम तारकादळं साक्षात जमिनीवर. "समजलास काय मला,' अशा आवेशानं स्वप्नांच्या विक्रेत्याला जमिनीवर आणण्यासाठी "किंग'ही सज्ज. अख्ख्या चित्रपटसृष्टीचाच "बाप' मानल्या जाणाऱ्यालाही मग सस्नेह निमंत्रण. "बापा'ची "शहजाद्या'सह हजेरी. अशी ही सगळी सरबराई.
चित्रपटसृष्टीतले "बाप', "पिते', पोरं, घरच्या सुना-बहिणी, ज्यांच्यासाठी ही खटपट करताहेत, ते खरे या सगळ्यांचे "बाप' असलेले प्रेक्षक कोणाच्या पारड्यात पसंतीचं माप टाकतात, हे कळायला वेळ लागेल.
-----------
-----------
Subscribe to:
Posts (Atom)