Mar 1, 2010

`होळी'चा हरवता चेहरा

मेट्रो'सिटी म्हणजे विविध संस्कृतींची, विविध जातिधर्मांच्या माणसांची सांगड घालणारे शहर, असा सर्वसाधारण समज आहे. परंतु पुण्यासारख्या शहराची ओळख आता विविध संस्कृतींची बजबजपुरी व्हायला लागली आहे की काय, अशी शंका घ्यायला वाव आहे.

होळीचंच उदाहरण घ्या! "होळी' म्हणजे फाल्गुन पौर्णिमा. शिमगा. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी होळीची परंपरा वेगळी आहे. कोकणात होळी म्हणून एक काठी (बरेचदा वठलेले झाड) उभे केले जाते आणि पौर्णिमेला त्याभोवतीच बरेच सरपण जमवून ते पेटवितात. अन्य ठिकाणीही वेगवेगळी पद्धत आहे. मात्र, होळी जाळण्याचा दिवस (किंवा रात्र!) पौर्णिमेचीच असते."होळी' खेळण्याविषयी मात्र अलीकडे बदलत्या काळात वेगवेगळे रंग दिसू लागले आहेत. प्रामुख्याने "रंगपंचमी'च्या दिवशी होळी खेळण्याची पद्धत बहुतांश ठिकाणी रूढ आहे. पुण्यात मात्र उत्तर भारतीय प्रभावामुळे आणि सुटीमुळेही कदाचित, होळी पौर्णिमेच्या दिवशीच रंगपंचमी साजरी केली जाते. होळीला सुटी नसली, तरी दुसऱ्या दिवशी, धुळवडीला सुटी नक्की असते. मग त्या दिवशीही रंग खेळला जातो. रंगपंचमी तर हक्काचीच!

होळीचा रंग नेमका कोणता म्हणायचा?

1 comment:

साधक said...

डोक्याला ताण कशाला? आम्ही दोन्ही वेळा खेळायचो.
औरंगाबादमध्ये धुळवडीच्या दिवशी तर पुण्यात पंचमीला. मी दोन्ही दिवस रंग खेळता यावे म्हणून प्रवासकरुन जात असे !