बरेच दिवस झाले तरी नकटीचं लग्न ठरत नव्हतं। वधूपित्यानं संभाव्य वर शोधून ठेवले होते। आपणच मुलीचा सांभाळ केलाय, असं म्हणविणारे काके-मामेही प्रयत्न करून थकले होते. पण "कुलस्वामिनी' कौल देत नव्हती. काही ना काही अडचण सतत येत होती.नकटीच्या लग्नापायी बऱ्याच जणांचं घोडं अडलं होतं. त्यांच्या सामाजिक कार्याच्या लालसेत अडथळा येत होता. समाजाच्या सेवेसाठी आयुष्य वाहून घेणाऱ्या त्या बिचाऱ्या प्रामाणिक गांधीवाद्यांचं, राष्ट्रवाद्यांचं सगळं अवसानच गळाल्यासारखं झालं होतं. इच्छा असूनही संधी न मिळाल्यानं समाजासाठी काही करता येत नव्हतं. नकटीच्या लग्नाचा एकदा बार उडवू, मगच समाजकार्य करू, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. पण कुठेतरी माशी शिंकत होती।
तसं एकदा वधूपित्यानं मनाचा हिय्या करून नकटीचं लग्न ठरवलंही होतं. स्वयंवरच मांडलं होतं म्हणा ना! तिला नटवून, सजवून मंडपात आणलं होतं. लग्नाची सगळी तयारी झाली होती. इच्छुक असलेले सगळे राजे-महाराजे, अथिरथी-महारथी जमले होते. सगळीकडे आनंदीआनंद होता. आता नकटीचं लग्न होणारच, असंच वातावरण होतं. मात्र पुन्हा कुलस्वामिनीनं डावा कौल दिला. झालं! सगळी मेहनत पाण्यात गेली. बरं, कुलस्वामिनीवर वधूपित्याची भक्ती अफाट. तिच्याशिवाय तर झाडाचं पानही हलायचं नाही. ती लांबच्या वारी असली, तरी विमानवारी करून तिच्या पायी लोटांगण घालण्याशिवाय कुणाला पर्यायही नव्हता.मध्यंतरी बरेच दिवस गेले।
नकटीचं लग्न हा आता नातेवाइकांच्या, शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या आणि काही चहाटळ पत्रकारांच्याही चेष्टेचा विषय झाला होता. कुणीही यावं आणि टपली मारून जावं, अशी नकटीची आणि त्यातून वधूपित्याची अवस्था झाली होती. बरं, आधीच त्याच्या घरातल्या, घराबाहेरच्या अनेक समस्यांनी तो मेटाकुटीला आला होता. बाहेरून घरात येऊन त्याच्याच डोक्यावर ठाण मांडून बसलेल्या सोयऱ्यांनी उभा दावा मांडला होता. नकटीला आम्ही सांभाळू, असं जाहीर करून, वधूपित्याची लायकीही त्यांनी चव्हाट्यावर मांडली होती. अधूनमधून त्यांचंही कुलस्वामिनीला कौल लावणं चालूच होतं. पण कुलस्वामिनी भक्तांची परीक्षाच पाहत होती जणू. कुणालाच नीट कौल देत नव्हती
....आणि एके दिवशी चमत्कार झाला! त्या बाहेरून आलेल्या परक्यांनी वधूपित्याची अब्रू पुन्हा चव्हाट्यावर मांडली आणि कुलस्वामिनीकडे धाव घेतली. आता वधूपित्याच्या हातून सर्व अधिकार जाणार आणि नकटीची जबाबदारी उपऱ्यांकडे जाणार, असंच निष्ठावंतांना वाटायला लागलं. पण झालं भलतंच. एवढे दिवस न पावलेली कुलस्वामिनी वधूपित्यावर अचानक प्रसन्न झाली. त्याच्या बाकीच्या मागण्या तर तिनं मान्य केल्याच, वर उपऱ्यांना गप्प बसण्यास सांगून त्याच्या पदरात आणखी दान टाकलं. आंधळा मागतो एक डोळा अन् देव देतो दोन म्हणतात, ते खोटं नाही. कुलस्वामिनीनं नकटीच्या लग्नालाही कौल दिला, तेव्हा तर वधूपित्याला आभाळ ठेंगणं झालं.मंडप पुन्हा सजला. सनई-चौघडे वाजू लागले. घराला रंगरंगोटी झाली. वधूपिता कधी नव्हे एवढा तजेलदार दिसत होता. नकटीच्या लग्नाचा मुहूर्त एकदाचा ठरला...बारामतीच्या व्याह्यांबरोबर बोलणीही झाली. पुढं पुढं करणाऱ्यांचे कानही सोनारानंच टोचले, ते बरं झालं. आता पुढच्या आठवड्याच्या मुहूर्ताकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत
...लग्नाला यायचं हं!
---------------
टीप ः या लेखातील सर्व पात्रे व घटना काल्पनिक आहेत। महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, मंत्रिमंडळ विस्तार यांच्याशी त्यांचा संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
-----
जगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच!) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ!
Sep 1, 2008
Aug 30, 2008
रामूची "आग' अन् प्रेक्षकांची होरपळ!
चित्रपटगृहात जाऊन 'फूंक' एकट्यानं बघणाऱ्यासाठी पाच लाख रुपयांचं बक्षीस रामगोपाल वर्मानं ठेवलं होतं. कुणी हे आव्हान यशस्वीरीत्या पेलल्याचा दावा केला, तर कुणी अर्ध्यावरच मैदान सोडून पळून गेलं म्हणे. 'फूंक'च्या जाहिरातीसाठीचा हा स्टंट होता, अशीही चर्चा झाली.रामू हा तसा डोकेबाज आणि ताकदीचा दिग्दर्शक. तसाच तऱ्हेवाईकही. त्याच्या चित्रपटातली पात्रं विक्षिप्त वागतात (आठवा ः 'रंगीला' सोडून कुठल्याही चित्रपटातली ऊर्मिला मातोंडकर किंवा अंतरा माळी! ), त्यावरून तो रामूच्याच व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू असावा की काय, असं वाटतं. लेखक नाही का, स्वतःच्याच कुटुंबात, आसपास पाहिलेली पात्रं आपल्या कलाकृतीत साकारतात. तसंच दिग्दर्शकांनाही आपल्या स्वभावावर, आयुष्यावर चित्रपट काढण्याची खुमखुमी असते. त्यातून रामू तर जीवनातल्या अनुभवांवर आधारितच चित्रपट बनवतो. त्यामुळं तर त्याच्याविषयीची शंका आणखी बळावते. त्यातून 'रात', 'भूत', 'वास्तुशास्त्र', 'डरना मना है', 'डरना जरूरी है' आणि आता 'फूंक' असे चित्रपट काढून आणि त्यातले काही दिग्दर्शित करून त्यानं आपला विक्षिप्तपणा सिद्धही केला आहे.
'फूंक' एकट्याने पाहा आणि पाच लाख रुपये मिळवा, हा जाहिरातीसाठीचा स्टंट होता, की आणखी काही, हे रामूच जाणे. आमच्या निरागस मनातला प्रश्न एवढाच आहे, की ही स्पर्धा 'फूंक'बाबतच का? आधीच्या भयपटांबाबत ती का नाही घेतली? खरं तर 'कौन' रहस्यपट असला, तरी रामूचा सर्वोत्तम भयपटच होता. आणि त्याहूनही मोठा आक्षेपाचा मुद्दा असा, की रामूनं आधीच्या 'दौड', 'गो', 'रोड', 'मिस्टर या मिस', 'नाच' या चित्रपटांबाबत ही स्पर्धा का नाही ठेवली? कारण हे चित्रपटदेखील आम्ही चित्रपटगृहात सलग पाहू शकलो नव्हतोच! एरवी, वीस-पंचवीस प्रेक्षकांसोबत ते पाहणं हा भयावह अनुभव होता. तर एकटे कसे काय पाहणार?
'रामगोपाल वर्मा की आग' म्हणून रामूनं 'शोले'ची जी काही अब्रू काढली होती, ती आम्हाला विव्हळत, घायाळ होत, धापा टाकत पाहावी लागली. 'आग' बघून केस उपटून न घेतलेला, कपडे-बिपडे टरकावून रस्त्यावरून पिसाटासारखा पळत न गेलेला प्रेक्षक दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी स्पर्धाही घेता आली असती. 'फूंक' वगैरे चित्रपट जसे प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी त्यानं काढले, तसेच हे काही चित्रपट त्यांचा सूड घेण्यासाठी काढले, असं आमचं स्पष्ट मत आहे. असो. रामूनं सत्याला सामोरं जावं, एवढंच आमचं मागणं आहे. 'सत्याला' म्हणजे सत्य परिस्थितीला. त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी असलेल्या 'सत्या'ला नाही!
Aug 17, 2008
एक हट्टी `देशप्रेमी'
... तरीही 'भारतकुमार' विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो पुन्हा कपाटातल्या 'ओम शांती ओम'च्या सीडीपाशी गेला. सीडी काढून त्यानं खिशात टाकली अन थेट न्यायालयाचा रस्ता धरला. विक्रमादित्य चालत असताना सीडीतून शाहरुख नावाचा वेताळ बाहेर आला. "काय रे मिळतं तुला बॉलिवूडच्या बादशहाला त्रास देऊन? प्रसिद्धी? " वेताळानं विचारलं. विक्रमानं चेहऱ्यावरचा हात हलकेसे बाजूला केला. वेताळ आणखी कावला. म्हणाला, "बरं, असो. एक गोष्ट ऐक! आटपाट नगराचा एक राजा होता. तो काही राजघराण्यात जन्मला नव्हता. 'काहीतरी मिळविण्यासाठी काहीतरी गमावावं लागतं, ' हे तत्त्व त्यानं स्वीकारलं आणि त्याला यशाचा राजमार्ग सापडला. नंतर तो स्वतःच एक 'ब्रॅंड' झाला. 'बाजीगर'चा 'किंग' झाला. एकदा 'किंग'नं स्वतः एक मोठा प्रकल्प हाती घेतला. त्यात तो स्वतः तर सहभागी होताच, पण देशातल्या सगळ्या राजांना घेतलं. देशप्रेमात बुडालेल्या एके काळच्या एका राजाला मात्र त्यानं अजिबात घेतलं नाही. उलट, आपल्या प्रकल्पात त्याची टवाळीच उडवली. त्या राजाला आपल्या 'राष्ट्रभक्ती'चा हा अपमान वाटला. असं करताना, स्वतःच्या काही प्रकल्पांत चांगल्याचुंगल्या 'राण्यां'ना वाईट वाईट दृश्यं करायला लावून त्यानं स्वतःच देशाची संस्कृती धुळीला मिळवली होती, याचा त्या राजाला स्वतःलाच विसर पडला होता... आता मला सांग विक्रमा, त्या 'किंग'चं काय चुकलं? तू जर बरोबर उत्तर दिलं नाहीस, तर तुझ्या डोक्याची शंभर शकलं होतील. " विक्रमानं थोडा वेळ विचार केला. मग तो म्हणाला, "किंग'चं एवढंच चुकलं, की त्या राजाचं आधीचं कर्तृत्व लक्षात घेऊन त्याला मान द्यायला हवा होता. पण 'किंग'नं स्वतःच त्याची नक्कल केली. आणि जो स्वतःच दुसऱ्याची नक्कल कायम करत आला आहे, त्याची नक्कल होऊच शकत नाही! " "शाब्बास! विक्रमा, कधी नव्हे ते खरं बोललास! पण तू बोललास, आणि आपलं वचन मोडलंस. आता मी चाललो. पण एक लक्षात ठेव. तू नकलेच्या दृश्यांवर बंदी आणलीस, ती सगळ्या लोकांच्या घराघरात ती नक्कल पोचल्यानंतर! आता फक्त किरकोळ ठिकाणचं प्रदर्शन तू रोखू शकतोस. घराघरात पोचलेल्या सीडींचं काय करशील? " वेताळ पुन्हा सीडीमध्ये गेला आणि चार बोटांनी चेहरा झाकून आणि दुसऱ्या हाताची घडी घालून विक्रमादित्य पुन्हा विचारात पडला...
Aug 11, 2008
ही पोरगी आवरंना!
प्रसंग क्र. १.
स्थळ - टीव्हीएस व्हिक्टरची पेट्रोलची टाकी.
वेळ - दुपारी 1. (शाळेतून परततानाची)
पात्र ः मुलगी आणि (शरणागत) बाप।
संदर्भ ः नुकताच कुठल्यातरी दुकानात पाहिलेलं शाहरुख खानचं पोस्टर।
मुलगी ः बाबा, आपण शाहरुख खानकडे कधीच जात नाही!...बाबा फ्लॅट!
जवळपास गाडीवरून कोसळण्याच्याच तयारीत. कसेबसे सावरतात।
"कुणाकडे?'
"शाहरुख खानकडे!'
"अहो, आपण कधीतरी शाहरुख खानकडे जाऊया ना!'
"शाहरुख खान काय तुझ्या बापाचा नोकर आहे, तुला भेटायला मोकळा असायला!'
(हे वाक्य अर्थातच मनातल्या मनात म्हटलेलं. कारण उघडपणे बोललं, तर पुन्हा कुठल्या तरी प्रसंगात ते आपल्याच तोंडावर फेकलं जाण्याची शक्यता जास्त. त्यामुळं बापाला शेपूट घालण्याशिवाय पर्याय नाही.)(मग साळसूदपणाचा आव आणून...)
"अगं, शाहरुख खान खू.................प लांब राहतो।' ( पण हे देखील उत्तर फारसं पटण्याची शक्यता नाही. कारण मुंबई खू...........प लांब नाही, याची तिला कल्पना आहे. त्यापेक्षाही खू........................प लांब, म्हणजे उटीचा दौराही ताजा आहेच! मग पुन्हा काहीतरी दुसरं कारण शोधायला हवं।)"
``अगं, तो असा कुणालाही भेटत नाही. त्याला वेळ नसतो. आपण त्याला फोन करू, आणि मग जाऊ हां'
"मग आपण त्याला भेटल्यावर सांगू, की "तू दिल में मेरे है दर्दे डिस्को' गाणं म्हटलयंस, ते आम्हाला माहितेय!'
(ही पोरगी एके दिवशी सिंहाचे दात सुद्धा मोजेल!)
मग काहीतरी दुसरा विषय काढून बाप आपली सुटका करून घेतो...
-----------
प्रसंग 2 -
स्थळ -ः घराचं स्वयंपाकघर।
वेळ ः दूपारी 1.30 (शाळेचा हॅंग ओव्हर उतरवण्याच्या प्रयत्नांच्या वेळची)
पात्र ः मुलगी आणि (आज्ञाधारक) बाप।
शाळेत नुकत्याच शिकवलेल्या "आज गोकुळात रंग खेळतो हरी'वर धुमाकूळ चालला आहे।
बाप ः "हे गाणं कशासाठी शिकवलंय, तुला माहितेय?'
"कशासाठी?'
"दहीहंडीसाठी! तुला दहीहंडी आठवतेय? आपल्या सोसायटीत खाली मैदानात बांधतात ना॥ती! ती कोण फोडतं सांग?'(तिच्या स्मरणशक्तीला चालना देण्याचा प्रयत्न।)"
तुषारदादा!'
"हां...बरोब्बर! अरे, तुझ्या लक्षात आहे तर!!"...(बापाचं ऊर भरून आलंय. पण नंतर पोरीच्या "कॅरम बॉल'नं हेच ऊर फाटणार आहे, याची त्याला काय कल्पना?)
"मग...तशीच हंडी तुमच्या शाळेत पण बांधणार आहेत...! ती कोण फोडणार सांग?'
(बाप अगदी उत्सुकतेनं विचारतो)
``बाई!''
(बाप स्टुलावरून खाली!! बाई...? म्हणजे ही टिल्ली पिल्ली पोरं खाली गोल करून...आणि त्यांच्या उरावर बसून बाई हंडी फोडणार?? काय तरी कल्पनाशक्ती! तिला काय, तिच्या समोर जी कुणी प्रमुख मोठी व्यक्ती दिसते, तिचं नाव दिलं ठोकून तिनं! इथं बापाची काय हालत होईल, याची तिला काय फिकीर?)
-------
प्रसंग क्र। 3 -
स्थळ - (पुन्हा) टीव्हीएस व्हिक्टरची पेट्रोलची टाकी।
वेळ ः दुपारी 2. ("सिंग इज किंग' पाहून परततानाची)
पात्र ः मुलगी आणि (गरीब बिच्चारा) बाप।
संदर्भ ः गेल्या वर्षभरात पाहिलेले डझनभर चित्रपट.
."बाबा, ते कांदे-पोहे गाणं कुठल्या पिक्चरमध्ये आहे हो?'
"सनई चौघडे'"हां...ते कुणीतरी असं रडत असतं, तेव्हा लागतं तेच ना ते?'
"हो।'"
आई आणि मी बघितला ना तो पिक्चर?'
"हो।'"
"तुम्ही नाही ना बघितलात?'
"नाही. मी तुमच्याबरोबर नव्हतो. पण मी तो आधीच बघितलाय।'"
"आधीच? आधीच कधी? तुम्ही "दूरदेशी' गेला होतात, तेव्हा का?'
("दूरदेशी गेला बाबा गेली कामावर आई' गाणं तिला पाठ आहे. दूरदेशी म्हणजे कुठेतरी लांब, एवढं कळतंही. पण ती त्याचा असा वापर करेल, याची काय कल्पना?)
------------

`रामदास'बोध!
सं त अंबुमणी रामदास महाराजांचा वर्ग सुरू होता. स्वतः रामदासबुवा व्यसनमुक्तीवर प्रवचन देत होते। समोर साक्षात "भीष्माचार्य' अमिताभ, "युधिष्ठिर' आमिर, "दुर्योधन' सलमान, संजूबाबा, यांसारखे ज्ञानी, अभ्यासू, विचारवंत श्रोते बसले होते। बिपाशा, करीना, दीपिका, प्रियांका यांसारख्या भक्तिणींचा मेळाही जमला होता। सध्या फारशा चर्चेत नसलेल्या मनीषा, राणी, प्रीतीसारख्या भक्तिणी एका बाजूला स्वेटर विणण्याचं सामान आणि तूप व वाती घेऊन बसल्या होत्या।महाराजांची रसवंती झरझर पाझरत होती। अनेक श्लोक, ओव्या, जुन्या काळचे संदर्भ, ताज्या काळातली व्यसनाधीनतेची भीषण स्थिती, यांवरची उदाहरणांमागून उदाहरणं दिली जात होती. कोपऱ्यात बसलेल्या एका श्रोत्याचं मात्र या सगळ्याकडे लक्ष दिसत नव्हतं. तो धुराची वलयं सोडण्यात मग्न होता. "हर फिक्र को धुएँ में उडाता चला गया'छाप भाव त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होते. अखेर रामदासबुवांनी त्याला झापलंच. "तुमच्या कीर्तनात व्यत्यय तर येत नाहीये ना? छातीचा खोका झाला, तर माझ्या होईल. तुम्हाला काय करायचंय? ' स्वभावाप्रमाणं आगाऊपणानंच त्यानं बुवांना विचारलं।
बुवा चरकले, तसंच श्रोतेही।
कुणी तरी विचारलं, "कोण आहे रे तो उर्मट माणूस? '
त्याच क्षणी शेजारच्यानं त्याच्या खाडकन मुक्सटात मारली।
""बॉलिवूडच्या "किंग'ला ओळखत नाहीस? '' पाठोपाठ प्रश्न आला।
बुवांनी शाहरुखला आणखी खडे बोल ऐकवले. शाहरुखही गप्प बसला नाही. शब्दाला शब्द वाढला आणि वातावरण एकदम तापलं. मग शाहरुखचे मित्रही त्याच्या मदतीला धावले. बच्चनही मदतीला धावले. नंतर बुवांनीच नमतं घेतलं आणि कीर्तन उरकून टाकलं।
मध्यंतरी काही काळ गेला. एरवी शांत, विचारवंत, बुद्धिवंत म्हणून प्रसिद्ध असलेला एक श्रोता - आमिर हा छुपा रुस्तम ठरला. एरवी कुठल्याही वादात आणि "सोहळ्या'त न पडणाऱ्या (आणि फक्त चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळीच प्रेसशी जवळीक साधणाऱ्या) आमिरनं स्वतःच सिगारेटच्या व्यसनात अडकल्याचं कबूल करून टाकलं, तेव्हा रामदासबुवांसकट अख्ख्या चित्रपटसृष्टीला धक्का बसला. मात्र, भाच्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आपण या "विकतच्या दुखण्या'तून मुक्त होऊ, असंही जाहीर करून आमिरनं रामदासबुवांना थोडा धीर दिला. नेहमीच्या स्पर्धेप्रमाणं आधी व्यसन कोण सोडणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती।
स्वतः व्यसनाची कबुली देणारा आमिरच ग्रेट आणि व्यसन न सोडण्याचं जाहीर करणारा शाहरुख उद्धट, याविषयी कुणाचं दुमत नव्हतं. पण शेवटी "किंग'नंच बाजी मारली. रामदासबुवांच्या उपदेशाच्या डोसानं नव्हे, तर मुलांच्या प्रेमानं ही किमया केली होती. आपण विमानात 17 तास सिगारेटविना राहू शकतो, तर जमिनीवर का राहू शकणार नाही, असा साक्षात्कार "किंग'ला झाला. कदाचित, त्याला "स्टार' बनविणाऱ्या "बाजीगर'मधल्या एका वचनानं त्याला प्रेरणा दिली असावी- "हार कर भी जितनेवाले को "बाजीगर' कहते है।'
ता. क. - सिगारेट सोडण्याची "अफवा' शाहरुखनं पुन्हा नाकारली आहे. त्यामुळे त्याला पुन्हा रामदासबुवांच्या व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्याचा विचार त्याचे कुटुंबीय करत आहेत, म्हणे!
Subscribe to:
Posts (Atom)