तसे ते रोजच्या बोलण्यातलीच प्रश्न आणि वाक्ये. पण काही काही वेळा डोकं उठविणारी. तुम्हालाही अशाच प्रश्नांचा सामना अनेकदा करावा लागला असेल. बघा बरं आठवून...!
1. हा...कोन बोल्तय?
- अरे गाढवा! फोन तू केलायंस ना? मग तू आधी सांग, तू "कोन' बोल्तोय्स ते! मग माझं बघू.
---
2. कुठे आहेस?
- मसणात! तुला काय करायचंय? तुझं काम काय आहे, ते बोल ना!
---
3. काय म्हणतोस?
- वयाच्या साधारणपणे वर्षापासून, म्हणजे बोलता यायला लागल्यापासून मी बरंच कायकाय म्हणतोय. त्यापैकी काय काय सांगू?
---
4. काय, हल्ली भेट नाही, बोलणं नाही!
- तुझा मुडदा बशिवला! मसण्या, भेटायला वेळ आहे का तुला? कामाशिवाय तोंड उचकटतं का तुझं? समोर दिसलो, म्हणून काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं?
---
5. काय विशेष?
- डोंबल! आमच्यासारख्या यःकश्चित मध्यमवर्गीय जंतूंच्या आयुष्यात काय असणार आहे विशेष? अवशेष आहेत फक्त!
---
6. बाकी काय?
- शून्य. भाज्य आणि भाजक यांचा भागाकार पूर्ण होतोय. बाकी काहीच उरत नाही.
---
7. या की एकदा घरी!
- हो, येतो हां "एकदा' घरी! अरे कंजूषनारायणा, "कधीपण या' म्हण की! "एकदा' या म्हणजे काय? तुझ्या समोरच तर राहतो मी! घरात जोरात शिंकलास, तरी आम्हाला अभिषेक होतो. मग कधीही आलो, तर तुझी इस्टेट कमी होणारेय काय?
---
8. ठेवू का मग?
- प्लीज! अजून किती वेळ पिडशील?
----
6 comments:
हेहेहेहे :D
मस्तच लिहिलं आहेस!! बरीच मोठी गॅप घेतली पण ब्लॉग अपडेट करायला??
आणि स्वतःच फोन करून कोण बोलतयं विचारणारे कसले डोक्यात जातात ना?? आणि हटकून हे लोक आणि त्यांचे कॉल्स म्हणजे एक्दम 'राँग नंबर' असतात!!!
एक नंबर... :)
"काय जेवन सुरु आहे का..??? "..अरे बावळटा दिसत नाही का...डोळे फ़ुटले का तुझे...!!!
हे हे हे
hey,awadh tu kadhi boltos phone war?????
he he he.....
anw bhari haay!!!!!!
lai bhari
Post a Comment