याआधीच्या पोस्टवर एकपण कॉमेंट आलेली नाही. तरीही, नव्या जोमानं लिहायला बसलोय. आता तर कुणी कॉमेंट टाकली नाही, तर रोजच ब्लॉग लिहायची धमकी देईन मग! बसाल बोंबलत!
सध्या व्यायामाविषयी लिहावंसं वाटतंय. माझा अतिशय आवडीचा (टाळण्याच्या दृष्टीनं) विषय. "व्यायाम हा असा आयाम आहे, जो न करणं, हाच माझा नियम आहे,' अशी एखादी रद्दी "ग्राफिटी' मला स्फुरतेय. (एखादी म्हणजे? सगळ्याच रद्दी असतात!) असो.मी जवळपास 84 किलोचा ऐवज झालोय आता. तुम्ही समोरासमोर भेटलात, तर नाही जाणवणार, पण झालोय खरा. कदाचित सहा फुटांपर्यंतच्या उंचीमुळे जाडी झाकोळून जात असावी. झोकोळो बापडी. पण कमी तर होत नाही ना?
व्यायाम बियाम करून वजन कमी करण्याच्या तत्त्वावर माझा कधीच विश्वास नव्हता. किंबहुना, लग्नापर्यंत तशी वेळच कधी आली नव्हती. लग्नाआधी मी वजनाची साठी कधी गाठली नव्हती. "पाप्याचं पितर'च होतो मी. कुण म्हणायचं, जास्त पाणी पी. कुणी म्हणायचं, कार्लं-दोडका खा. कुणी म्हणायचं, जास्त खाऊ नको, तर कुणी न चावता न खाण्याचा सल्ला द्यायचं. प्रत्येकाच्या अकलेच्या उडीनुसार ते सल्ला द्यायचे. मला सगळ्यांचाच पटायचा आणि कुणाचाच पटायचा नाही. पण त्यानं मी जिवाला त्रास बिस करून घेतला नाही, आणि पोटभर खायचं सोडलंही नाही. एकतर खाण्याचा आणि भुकेचा काहीएक संबंध नाही, या तत्त्वावर माझा गाढा विश्वास. म्हणजे, समोर दिसलं की खायचं. त्यामुळं मला भूक लागलेय, असे प्रसंग जीवनात फारच क्वचित आले असतील. भुकेनं कासावीस वगैरे होणं तर आपल्याला बापजन्मात शक्य नाही!
अशी साथ असेल, तर जॉगिंगला
पहाटे सहालाच काय, चार वा.
कोण उठणार नाही?
पुण्यात आल्यावर कॉट बेसिसवर राहत होतो, तेव्हा सकाळी आंघोळादी आन्हिकं उरकून अण्णाच्या हॉटेलात मिक्स खिचडी नाहीतर मिक्स पोहे खाणारा लॉजवरचा मीच पहिला असायचो! एकतर नऊ वाजले की माझा भुकेनं जीव जायचा आणि बाकीच्यांसाठी थांबण्याचं शारीरिक आणि आर्थिक बळही नसायचं. कारण बाकीचे सगळेच कर्मदरिद्री! फुकट खायला मिळालं, तरच खाणारे. मग त्यांना कशाला उरावर घ्या? मी आपला एकटाच हादडून यायचो.तरीही जिवाला काही लागलं नाही. कदाचित, सगळ्याच टेन्शनमुळे असेल. मी मजेत असलो, तरी सुखा-बिखात नव्हतो. खाऊन-पिऊन सुखी असलो, तरी समाधानी वगैरे नव्हतो. बायको नावाचं प्रकरण माझ्या आयुष्यात आलं आणि आयुष्य बदललं. तिनं दिलेल्या प्रेमामुळे म्हणा, किंवा तिच्या हातच्या जेवणामुळे म्हणा; चांगला भरगच्च झालो. बाळंतपणात तिच्या जाडीवरून चिडवता चिडवता एके दिवशी मीच गोल-गरगरीत दिसायला लागलो आणि डॉक्टर मित्राकडे सहज गेलो असताना, त्यानं जबरदस्तीनं वजनकाट्यावर चढायला लावलं. 84 किलो! माझ्यासकट तो तीन ताड उडाला."अभ्या, वजन कमी कर लेका! मरशील अशानं. जिना चढला, तरी दम लागत असेल तुला!' अशी आर्त किंकाळी त्यानं ठोकली.पण मी त्याच्या बापाला दाद देणारा नव्हतो.एकतर, त्याच्या वैद्यकीय गणिताप्रमाणं माझ्या उंचीनुसार माझं वजन 74 किलो असायला हवं. ते मी कधीही करू शकतो, असा माझा दावा आहे. फक्त त्यासाठी वेळ देऊन पोहायला किंवा चालायला जायला हवं. तेच काही जमत नाहीये.
इन्स्ट्रक्टरही अशी असेल, तर
जिमचे पैसे वसूल!
दुसरं म्हणजे, मला जिना चढून दमबिम लागत नाही. पर्वतीही मी एका न थांबता चढतो आणि ट्रेकला
तर कुठेही, कधीही जातो. हल्ली पूर्वीपेक्षा थोडी जास्त फासफुस होते, एवढंच.व्यायामाचे थोडेफार प्रयत्न केले. नाही असं नाही. पण त्रास खूप आहे हो! मध्यंतरी योगासनं शिकलो. पण क्लास संपल्यावर ती बोंबलली. सायकल विकत घेतली, ती चोरीला गेली. आता दैवच मला साथ देत नाही, तर मी जायचं कुठं?तरीही, वजन कमी करायला हवं आणि नियमित व्यायामही करायला हवा, हे खरंच. पण खूप कष्ट आहेत हो! पहाटे उठा, शरीराला श्रम द्या, बूटबिट घ्या, पैसे घालवा!कोण करणार हे सगळं?
----------
8 comments:
Abhijeetji..changle lihle aahe..wajan kami karaycha marga bhaltyach katyatun jato.. :)..aani ho,.. phototli instructor milalyawar nakkich maja yeil Vyayam karayla..Baryach diwsat tumhi "Parikshan" lihle nahi.. waiting eagerly to read ...
अभिजीतराव,
"कोन करनार हे सगलं"अवो असं कसं म्हनून चालल.चांगली प्रकुरती नाय, तर काय नाय बघा.आतां जरा जवान होता तो पुरत चाललं,पन जस,जसं वय होतं बघा तस तसं
हे नाय जमनार.येकदां कां तुमडी भरली मग
ती कमी करायला" बाबां " ला आठ्वायला लागल.आनि तसं करून पन तुमचं तुम्हालाच करायला पाहिजेल हाय."बाबां"पन काय करू शकनार न्हाई बघा.
हिथं कुनाचं पटायचं बिटायचं प्रस्न येत नाही बघा.शरिर हे पन येक परकारचं यंतर हाय!,पान्याच्या पंपाची डागडुजी न करून कसं चालल? त्याला पन तेलपानी लागतंच ना?न्हाईतर येक दिवस तो पन फॉंक फॉंक करूनशानी बाराच्या भावात जातो,असं हमजा म्हनत होता.
गुमान माझं सांगन ऐकून घ्या वांईच!
मला काय तुमचं यींग्रजी फ्रिंग्रजी समजत न्हाई.पन माझ्या दोस्ताचा मुलगा हलीच इंग्लंडहून आला होता.त्याला भेटायला गेलो होतो.तो म्हनला,"ह्येल्त ईज वेल्थ" असं काय तरी.मी म्हतलं म्हनजे रे काय बाबा
तो म्हनला,
"आयुक्ष येकदांच मिलतं. आनि जगन्याची स्ताईल चांगली ठेवलीत तर समदं चांगलं होतं"
आनि अभिजीतराव एक बघा सवताच्या जीवाला काय पन करून घेवून चालल.पन बरोबरच्या बायकां पोरांना म्हातारपनी फूक्कटचा वैताग नाय काय?
आच्च्याला येवढंच पुरं
शिरीकीसन
टायटल वाचून वाटलं होतं काहीतरी वेगळं असेल पण निघालं आणखीनच वेगळं :P
पण एक नक्की पोस्ट वाचल्यावर स्वतःच्या वाढत्या वजनाचाच विचार प्रथम मनात आला.. हं काहीतरी केलं पाहिजे आता.. काय ते सुचे पर्यंत आणि सुचल्यावर ते न करण्याची कारणे मिळे पर्यंत आशिषने कुठलं नवीन ठिकाण सुचवलंय का खाण्याचं ते वाचून येतो.. :P
sochne ka nahi mamu. jidagi khane (aur) peenne ke liye (limbu sarbat, kokam, neera!) hai. khate raho...
Uday
धन्यवाद,
प्रसाद, श्रीक्रुष्ण, अभि, उदय्राव!
वाचत राहा!
-अभिजित.
काय राव वजनाचं जामच टेन्शन घेतलेलं दिसतंयस? आजची ग्राफिटीपण सहिच आहे.. "वजन करताना हल्ली अंगावर काटा येतो..." :P
aare tu Ashish Chandorkar la olkhat nahis watate...tyachya kade bagh aani mag tujhe wajan wadhlyache dadpan 1dam kami houn jail....
aaho blogwar photo taktana dummy aakhli navhti ka? olinchi jaga chukli aahe...dummy akhayachi tips deto tumhala
1) 1 kora kagad ghya
2) tyala 8 ghadya ghala...
3) 8 mhatlyawar kapalawar athya padu deu naka..hya paper madhlya column chya 8 ghadya astat.
4) ata photo chi jaga tharwa
5) oli tyakhali lawa..
6) zali ka dummy?
7) ase kelyawar photo olinchi jaga chuknar nahi...
U might be wondering how I've become expert in making dummy...well that's a secret, which I will share in due course of time.
Post a Comment